जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शुभ घटना घडण्याअगोदर हे संकेत दिसू लागतात, ओळखण्यासाठी या टिप्स वापरा

शुभ घटना घडण्याअगोदर हे संकेत दिसू लागतात, ओळखण्यासाठी या टिप्स वापरा

शुभ घटना घडण्याअगोदर हे संकेत दिसू लागतात, ओळखण्यासाठी या टिप्स वापरा

Good Time Signs: काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो. आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यासाठी…

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑक्टोबर : आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्या आपल्याला चांगल्या-वाईट दिवसांचे संकेत देतात. परंतु, आपण ते संकेत वेळीच ओळखत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. धर्मग्रंथात सांगितले गेले आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो. आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, हे शुभ संकेत जाणून घेण्यापूर्वी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणे आवश्यक आहे. पौराणिक कथा काय - शास्त्रानुसार एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले. नारदजी म्हणाले, हे भगवान! स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे, हे माणसाला कसे कळणार? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद! जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते, तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो, काहींना ते समजतात आणि काहींना हे संकेत ओळखता येत नाहीत. जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे, जे आपल्या चांगल्या काळाचे सूचक आहेत. चांगल्या वेळेचे शुभ संकेत - घराबाहेर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. आपण गाईला रोटी खायला दिली पाहिजे, त्यातून आपल्याला पुण्य मिळते. घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले तर तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याचे ते संकेत मानू शकता. जर घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरटं करून राहू लागले असतील तर त्याचा अर्थ काही शुभवार्ता मिळण्याचे ते संकेत आहेत. घराबाहेर पडताना जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील आपल्यासाठी शुभ मानले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

कधीकधी आपल्या तळहातावर खाज सुटते, तसे होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. झोपेत असताना स्वप्नात माता लक्ष्मीजीचे दर्शन झाले तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐकू आली तरी ते शुभ लक्षण आहे. त्याचप्रमाणे घरात पांढरे कबुतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहे. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion , vastu
  • First Published :
जाहिरात
जाहिरात