मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganpati Pujan : श्रावणातील बुधवारी करा गणपतीचे पूजन, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या विधी

Ganpati Pujan : श्रावणातील बुधवारी करा गणपतीचे पूजन, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या विधी

गणेशाच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे.

गणेशाच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे.

श्रावणात दर सोमवारी महादेवाचे पूजन करतात, मंगळवारी गौरींचे पूजन करतात. मग आद्य दैवत गणपतींचेही पूजन केले गेले पाहिजे. श्रावणात गणपतीचे पूजन करण्याचेही विशेष महत्व असते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 10 ऑगस्ट : सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात अनेक सण आणि व्रत वैकल्य असतात. श्रावण महिना हिरवळ, सुख समृद्धी आणि आनंदाने भरलेला असतो. श्रावणात दर सोमवारी महादेवाचे पूजन करतात, मंगळवारी गौरींचे पूजन करतात. मग आद्य दैवत गणपतींचेही पूजन केले गेले पाहिजे. श्रावणात गणपतीचे पूजन करण्याचेही विशेष महत्व असते. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील बुधवारी गणपतीच्या या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या व्यवसाया संबंधित आणि आर्थिक समस्या दूर होतात. विघ्नहर्ता म्हणवल्या जाणाऱ्या गणपतीच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात गणेशाचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात. यामुळे गणेशजी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वाद देतात. चला जाणून घेऊया बुधवारी गणेशजींच्या कोणत्या मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या व्यवसाय, पैसा आणि करिअरशी संबंधित समस्या दूर होतात. प्राणप्रतिष्ठा मंत्र अस्यैप्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा क्षरन्तु च। अस्यै देवत्वमर्चार्यम मामेहती च कश्चन।।

Sweet Recipe : रक्षाबंधनाला बनवा ही झटपट होणारी मिठाई, भावासोबतचे क्षण होतील आणखी गोड

इच्छापूर्ती मंत्र ॐ गं गणपतये नमः श्रीगणेशाचा आमंत्रण मंत्र गजाननं भूतगणादिसेवितम कपित्थजम्बू फल चारू भक्षणं। उमासुतम शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम।। आगच्छ भगवन्देव स्थाने चात्र स्थिरो भव। यावत्पूजा करिष्यामि तावत्वं सन्निधौ भव।। संपत्तीसाठी मंत्र ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा। Makhana Kheer Recipe : गोड खायला आवडतं? या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर गणपती मंत्रांचा जप करण्याची योग्य वेळ बुधवारी श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. प्रत्येक इच्छेसाठी वेगळा मंत्र असतो. आपल्या इच्छेनुसार मंत्राचा जप करा. मंत्रजप केव्हाही करता येतो. तसेच गणपतीची पूजा करून आरती केली तर ते विशेष फलदायी मानले जाते. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी पूजेच्या वेळी मोदक आणि लाडू अर्पण करा. असे केल्याने भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात मान्यता आहे.
First published:

Tags: Lifestyle, Religion, Shravan

पुढील बातम्या