Home /News /lifestyle /

Makhana Kheer Recipe : गोड खायला आवडतं? या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर

Makhana Kheer Recipe : गोड खायला आवडतं? या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर

मखाना खीर ही आरोग्यासाठीही चांगली आहे आणि याच कारणास्तव हा उपवासाच्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. मखाना, दूध, तूप, केशर, ड्रायफ्रुट्स सोबत तुम्ही फक्त 30 मिनिटात तयार करू शकता.

  मुंबई, 3 ऑगस्ट : खीर अनेकदा सण आणि विशेष प्रसंगी बनवली जाते. उपवासासाठीही खीर हा सर्वोत्तम पदार्थ मानला जातो. खीरीचे अनेक प्रकार आहेत, पण मखाना खीर उपवासासाठी सर्वोत्तम मानली जाते. ही चवीने परिपूर्ण आहे आणि बहुतेक लोकांना आवडते. मखाना खीर ही आरोग्यासाठीही चांगली आहे आणि याच कारणास्तव हा उपवासाच्या सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. मखाना, दूध, तूप, केशर, ड्रायफ्रुट्स सोबत तुम्ही फक्त 30 मिनिटात तयार करू शकता. मखाना हे आरोग्यदायी प्रोटीनचा स्त्रोत आहे आणि ते अनेक रोगांपासून आपले संरक्षण करते. आज आम्ही तुम्हाला मखाना खीर बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी सांगत आहोत. मखाना खीरसाठी लागणारे साहित्य 200 ग्रॅम मखाना 2 लिटर दूध 50 ग्रॅम देशी तूप 100 ग्रॅम मनुका 250 ग्रॅम साखर 10 बदाम 10 काजू चिमूट केशर 4 हिरव्या वेलची

  Healthy Fries : मुलांना अनहेल्दी बटाट्याच्या फ्राईजपासून ठेवा दूर, बनवा हे दोन प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी फ्राईज

  मखाना खीर बनवण्याची सोपी पद्धत - प्रथम बदाम आणि काजूचे लहान तुकडे करा. आता गॅसवर पॅन ठेवा आणि मंद आचेवर त्यात तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात बदाम, काजू, मखाना घाला आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. - यानंतर हे ड्रायफ्रुट्स एका भांड्यात काढून ठेवा. आता अर्ध्याहून अधिक ड्रायफ्रूट्स घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर कढई गॅसवर ठेवून त्यात दूध घालून गरम करा. Healthy Recipe : मुलं बीट खात नाहीत? बनवा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट-बटाटा कटलेट - दुधाला चांगली उकळी आल्यावर त्यात साखर, वेलची पावडर, केशर आणि ग्राउंड ड्रायफ्रुट्स पावडर टाका. एक मिनिट मिश्रण ढवळा आणि नंतर उरलेले काजू, बदाम आणि मखाना घाला. - आता साधारण 15 मिनिटे उकळू द्या. मखाना पूर्ण मऊ होऊन संपूर्ण मिश्रण क्रीम सारखे झाल्यावर गॅस बंद करून एका भांड्यात काढून ठेवा. - आता काही ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा. हे जेवणात चवदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Recipie

  पुढील बातम्या