जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / तुमच्या बहिणीला तिच्या राशीनुसार ही द्या सुंदर गिफ्ट, भाऊबीज बनवा खास

तुमच्या बहिणीला तिच्या राशीनुसार ही द्या सुंदर गिफ्ट, भाऊबीज बनवा खास

तुमच्या बहिणीला तिच्या राशीनुसार ही द्या सुंदर गिफ्ट, भाऊबीज बनवा खास

या सणाला भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला काही पैसे किंवा भेटवस्तू देतो. राशीनुसार बहिणींना भेटवस्तू देण्याबाबत ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेली माहिती पाहुया.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर : हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात 5 दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून सुरू झालेली दिवाळी भाऊबीजेला संपते. आज 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी होत आहे. भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहीण एकमेकांना स्नेह अर्पण करतात. भाऊ बहिणीच्या घरी जातात आणि बहिणी भावाला औक्षण-टिळा लावतात. हिंदू धर्मातील रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजेच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या सणाला भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला काही पैसे किंवा भेटवस्तू देतो. राशीनुसार बहिणींना भेटवस्तू देण्याबाबत ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेली माहिती पाहुया. भाऊबीजेला बहिणींना या भेटवस्तू द्या - मेष ज्या बहिणींची राशी मेष आहे त्यांना लोकरीचे कपडे किंवा लाल रंगाची साडी भेट दिली जाऊ शकते. वृषभ ज्या बहिणीची राशी वृषभ आहे त्यांना चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने भेट देऊ शकता. मिथुन मिथुन राशीच्या बहिणीला या भाऊबीजेला लहरिया साडी भेट देऊ शकता. कर्क ज्यांची राशी कर्क आहे त्यांना पंचधातुच्या वस्तूसह कपडे भेट देऊ शकतात. सिंह ज्यांची राशी सिंह आहे, त्यांना ताम्रपत्र किंवा लाल रंगाचे ब्रेसलेट भेट द्या. कन्या कन्या राशीच्या बहिणींना पुष्पगुच्छ आणि हिरवी साडी भेट म्हणून दिली जाऊ शकते. तूळ ज्या बहिणींची राशी तूळ आहे त्यांना भेट म्हणून पांढरी लोकरी वस्तू आणि तांदूळ देऊ शकता. वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांना अष्टधातूची वस्तू आणि गुलाबी रंगाची साडी भेट द्या.

News18लोकमत
News18लोकमत

धनु धनु राशीच्या बहिणींना पितळी वस्तू आणि पिवळे कपडे भेट देऊ शकता. मकर ज्या बहिणींची राशी मकर आहे, त्यांना स्वयंपाकघरातील भांडी किंवा इतर भांड्याच्या स्वरुपात इतर वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकतात. हे वाचा -  यंदा भाऊबीज-बलिप्रतिपदा एकाच दिवशी, बहिण-भावाच्या नात्याची अशा आहेत कथा कुंभ ज्या बहिणींची राशी कुंभ आहे त्यांना विजेशी संबंधित वस्तू भेट देणे चांगले ठरेल. मीन ज्या बहिणींची राशी मीन आहे त्यांना आकाशी रंगाचे कपडे भेट म्हणून दिले जाऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात