जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Dhanteras 2022 Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवा पैसा-धन, कधीही आर्थिक कमतरता नाही भासणार

Dhanteras 2022 Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवा पैसा-धन, कधीही आर्थिक कमतरता नाही भासणार

Dhanteras 2022 Vastu Tips: घराच्या या दिशेला ठेवा पैसा-धन, कधीही आर्थिक कमतरता नाही भासणार

धनत्रयोदशीला आरोग्याची देवता धन्वंतरी, धनाची देवी, लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेरची मानली जाते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : सनातन धर्मात ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले आहे. ज्योतिषशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीशी संबंधित आहे. दुसरीकडे, वास्तुशास्त्राचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या घराची दिशा, घरात ठेवलेल्या वस्तूंच्या दिशेशी आहे. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे दिसून येतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या उद्भवू नयेत, यासाठी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा धनत्रयोदशीच्या दिवशी पैसा कुठे-कसा ठेवावा, त्या स्थानासाठी कोणती दिशा शुभ मानली जाते, याविषयी सांगत आहेत. धनत्रयोदशीसाठी वास्तु टिप्स - धनत्रयोदशीला आरोग्याची देवता धन्वंतरी, धनाची देवी, लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही संपत्तीची देवता कुबेरची मानली जाते. या दिवशी तुमची तिजोरी, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने किंवा कपाट नेहमी उत्तर दिशेला ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार या वस्तू उत्तर दिशेला ठेवल्याने घरात सौभाग्य येते आणि धनसंपत्ती दुप्पट होते. वास्तुशास्त्रानुसार तुमची तिजोरी उत्तर दिशेला ठेवताना लक्षात ठेवा की, तिचा दरवाजा दक्षिणेकडे उघडू नये. धार्मिक मान्यतेनुसार, धनाची देवी लक्ष्मी दक्षिणेकडून भ्रमण करून उत्तरेला वास करते. त्यामुळे तिजोरीचा दरवाजा या दिशेला उघडल्यास घरात पैसा कधीच थांबत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

काही कारणास्तव घराची तिजोरी उत्तर दिशेला ठेवता येत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला ठेवू शकता. दुकानाची तिजोरी या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. जर रोखपाल या बाजूला बसला असेल तर तिजोरी रोखपालाच्या डाव्या बाजूला असावी आणि रोखपाल पूर्व दिशेला तोंड करून बसला असेल तर तिजोरी उजव्या बाजूला असावी. हे वाचा -  दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कधीही घराच्या कोपऱ्यात ठेवू नये. तिजोरी ठेवण्यासाठी ईशान्य, नैऋत्य कोपरे अशुभ मानले जातात. या दिशेला तिजोरी ठेवल्याने अशुभ होते आणि पैसा लवकर खर्च होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात