मुंबई 4 ऑगस्ट : नवरात्रीनंतर चाहूल लागते ती दसऱ्याची. अश्विन महिन्यात दसरा किंवा विजयादशमी हा सण साजरा केला जातो. देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते आणि लोक देविच्या मूर्तीचे विसर्जन करतात, तसेच महाराष्ट्रात सोन लूटून देखील हा सण साजरा केला जातो. परंतू तुम्हील लोकांना या सणाला दसरा किंवा विजयदशमी म्हणताना पाहिले असेल. पण तुम्हाला या दोघांमधील फरक ठाऊक आहे का? तुम्हाला हे दोन्ही एकच वाटत असलं तरी देखील ते वेगवेगळे आहेत. प्राचीन काळापासून विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या दहाव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी दशानन रावणाचा वध केला तेव्हा या दिवसाला दसरा असेही म्हणतात. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊ. 1. असुराचा वध: या दिवशी माता दुर्गाने महिषासुराचा वध केला. रंभासुराचा पुत्र महिषासुर, जो अत्यंत शक्तिशाली होता. त्याने ब्रह्माची कठोर तपश्चर्या केली. ज्यानंतर ब्रह्मा प्रकट होऊन म्हणाले- ‘वत्स! एक मृत्यू सोडून तु बाकी काहीही माग.’ यावर महिषासुराने खूप विचार केला आणि मग म्हणाला- ‘ठीक आहे प्रभु. मला कोणताही देव, दानव आणि मानवापासून मृत्यू देऊ नका. फक्त कोणत्याही महिलेच्या हातून मला मृत्यू मिळू देत.’ हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने तिन्ही लोकांवर आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली आणि तो त्रिलोकाधिपती झाला. त्यानंतर सर्व देवतांनी महाशक्तीची पूजा केली. कारण त्यांना माहित होतं की आता देवीच यातून त्यांची सुटका करु शकते. हे वाचा : Dussehra 2022 : शुभ योगामुळे यंदाचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण; ‘हे’ आहेत खास मुहूर्त देवतांन पूजा केल्यानंतर त्यांच्या शरीरांतून एक दिव्य तेज उत्पन्न झाले आणि परम सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाले. ज्यानंतर हिमवनाने भगवतीच्या स्वारीसाठी सिंह दिला आणि सर्व देवांनी आपली शस्त्रे महादेवीच्या सेवेत सादर केली. देवतांवर प्रसन्न झालेल्या भगवतीने त्यांना लवकरच महिषासुराच्या भयापासून मुक्ती मिळेल असे आश्वासन दिले. 9 दिवस संघर्ष केल्यानंतर 10 व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला, म्हणून विजयादशमी हा सण साजरा केला जातो. महिषासुर हा एक असुर म्हणजेच दैत्य होता. तो राक्षस नव्हता.
2. राक्षसांचा वध: असे म्हटले जाते की भगवान श्री राम आणि रावणाचे युद्ध बरेच दिवस चालले, शेवटी दशमीच्या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला आणि रावण हा राक्षस होता, तो असुर नव्हता. ज्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. 3. धर्माचा विजय: या दिवशी अर्जुनाने कौरव सैन्यातील लाखो सैनिकांचा वध करून कौरवांचा पराभव केला, असेही म्हटले जाते. हा धर्माचा अधर्मावरील विजय होता.