दसरा अर्थात विजयादशमी हा हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण आहे. आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातल्या दशमीला दसरा साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी दसरा हा एक मुहूर्त आहे. या दिवशी शस्त्रपूजन, सरस्वती पूजन केलं जातं.
याच दिवशी श्रीरामाचा पूर्वज रघू यानं विश्वजित यज्ञ केला होता. त्यामुळे त्रेता काळापासून हिंदूधर्मीय विजयादशमी साजरी करतात असं मानलं जातं. याच दिवशी रामानं रावणाचा वध केला. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन केलं जातं. नऊ दिवस चालणाऱ्या य