मुंबई, 06 मे : भारतात ग्रहण शुभ आणि अशुभ, धर्म आणि चालीरीती यांच्या संयोगाने पाहिले जाते. सूतक कालावधी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होण्याच्या 9 तास आधी मानला जातो. या दरम्यान, अनेक गोष्टी करण्यास मनाई असते. काल म्हणजे 05 मे रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण झाले. हे चंद्रग्रहण काल रात्री 08:46 वाजता सुरू झाले आणि रात्री 01:02 वाजता संपले. हे ग्रहण भारतात फारसं दिसलं नाही, त्यामुळे त्याचा सूतक कालावधीही वैध नव्हता. पण, सर्वसाधारण ग्रहणकाळात काही नियम सांगितले जातात, काही नियम ग्रहण संपल्यानंतरही पाळले जातात. कोणतंही ग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत ग्रहणानंतर घर आणि देव्हाऱ्याशी संबंधित कोणते नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ग्रहण संपल्यानंतर गंगाजलाचा उपाय - ग्रहण संपल्यामुळे आज घरातील देव्हाऱ्यात गंगाजल शिंपडावे. इतकंच नाही तर देव्हाऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी त्यावर गंगाजल शिंपडून स्वतःची शुद्धी करणेही अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गंगाजल शुद्ध असते आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या ग्रहणाचा प्रभाव पडत नाही, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव दूर करण्यासाठी घराच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे.
मूर्तींची स्वच्छता - ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर देव्हाऱ्यातील प्रत्येक मूर्ती आणि फोटो स्वच्छ करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही लिंबू, दही, चंदन वापरू शकता. जर तुम्ही तुमच्या घरातील मूर्तींना कपडे घातले असतील तर त्यांनाही तुम्हाला बदलण्याची गरज आहे. सूतक काळात देवाला घातलेले कपडे पुन्हा देवाला घालू नयेत. गिफ्ट म्हणून मिळालेल्या या वस्तू घरात ठेवू नये; अडचणी-संकटांचे बनू शकतात कारण मंदिरातील भांड्यांची साफसफाई ग्रहण संपल्यानंतर करा. तुम्ही ज्या भांड्यांसह देवाची पूजा करता किंवा तुमच्या देव्हाऱ्यात ठेवलेली भांडी स्वच्छ करावीत. याशिवाय ग्रहण संपल्यानंतर मंदिर-देव्हाऱ्यांमध्ये ठेवलेला कलश, घंटा, गदा, त्रिशूळ, शंख इत्यादींची स्वच्छता करणे गरजेचे आहे. सूतक काळाच्या वेळी देव्हारा झाकण्यासाठी वापरलेले कापड देखील काढून टाकावे आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. अशी स्वप्नं पडणं शुभ संकेत असतात! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभ होण्याचे योग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)