1. सापाचे बीळ स्वप्नात जर तुम्हाला सापाचे बीळ (snake in dream) किंवा बिळातून बाहेर येताना साप दिसला तर ते जीवनात काहीतरी चांगले आणि शुभ होण्याचे लक्षण मानले जाते. हा इशारा असतो की, भविष्यात तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत.
2) झाडावर चढणे - जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला झाडावर चढताना पाहिले असेल, तर तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळाल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
3. नृत्य करणारी स्त्री स्वप्नात एखादी स्त्री नाचताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. हे भविष्यात अचानक पैसे मिळण्याचे संकेत देते.
4. सोने पाहणे स्वप्नात सोने दिसल्यास ते घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच पैसे आणि सोने मिळू शकते.
5. मधमाशांचे पोळे स्वप्नात मधमाशांचे (Honey Bee Nest In Dream) पोळे पाहणे देखील शुभ मानले जाते. मधमाशांचे पोळे हे संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे आणि तुम्हाला कदाचित अचानक पैसे मिळू शकतात.
6. उंदीर स्वप्नातील उंदीर ही श्रीगणेशाची स्वारी आहे, विघ्नकारी आहे. स्वप्नात उंदीर दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. उंदीर दिसणे हे घरात पैसे येण्याचे संकेत आहे.
अंगठी - स्वप्नात अंगठी घातलेली दिसली तर भविष्यात शुभ लाभ होतो. तुम्ही स्वप्नात स्वत:ला पांढरी किंवा लाल मोत्याची अंगठी घातलेली दिसली तर ते तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता असते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)