मुंबई, 08 नोव्हेंबर : आज कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर 2022 सालातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण आज संध्याकाळी 05.32 पासून सुरू होईल आणि 06.19 वाजता संपेल. या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 09 तास आधी सकाळी 09:21 पासून सुरू होईल. अशा स्थितीत व्यक्तीने सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करू नये किंवा खाणे किंवा झोपू नये , असे मानले जाते. गर्भवती महिलांनी विशेष लक्ष द्यावे. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. धार्मिक श्रद्धेनुसार, ग्रहणाचा सर्वाधिक त्रास गर्भवती महिलांना होतो. चंद्रग्रहण संपल्यावर काय करावं, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम आपल्यावर पडणार नाही, याची तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी दिलेली माहिती पाहुया. चंद्रग्रहण वेळ 2022 चंद्रग्रहणाची सुरुवात: आज संध्याकाळी 05.32 वा चंद्रग्रहणाची समाप्ती: आज संध्याकाळी 06.19 वा सुतक कालावधीची सुरुवात: आज सकाळी 09.21 पासून सुतक कालावधीची समाप्ती: चंद्रग्रहण समाप्तीसह चंद्रग्रहणानंतर हे उपाय करा - 1. धार्मिक मान्यतांनुसार ग्रहणाच्या वेळी घर आणि आजूबाजूची जागा अपवित्र होते. अशा स्थितीत चंद्रग्रहणानंतर घराची स्वच्छता करावी. यासाठी स्वच्छ पाण्यात गंगाजल मिसळून घरभर शिंपडा. असे केल्याने ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतात. 2. चंद्रग्रहण संपल्यानंतर व्यक्तीने स्नान करावे. यासाठी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करणे अधिक उपयुक्त ठरेल. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला. आंघोळीनंतर ग्रहण काळात परिधान केलेले कपडे घालू नका. ते धुवून टाका. 3. जे जानवं घालतात त्यांनी आंघोळ केल्यानंतर जानव्याचा धागा देखील बदलला पाहिजे. नवीन धागा घाला. यानंतर तांदूळ, पांढरे वस्त्र, दूध किंवा चंद्राशी संबंधित वस्तूंना स्पर्श करून दान करावे.
4. वस्तू दान करताना म्हणा की हे चंद्रदेव ! ज्याप्रमाणे तुमच्याकडून ग्रहणाची वाईट वेळ निघून गेली, त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातील वाईट काळ आणि संकटेही निघून जाओत. जीवनात सुख आणि समृद्धीसाठी माझ्यावर कृपा कर. 5. चंद्रग्रहणानंतर गंगेच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी प्यावं. जेवणात तुळशीची पाने टाकूनच तुळशीच्या पानांचे सेवन करावे. गंगाजल आणि तुळशीला पवित्र मानले जाते. त्यामुळे सर्व प्रकारचे विकार दूर होतात. Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम 6. चंद्रग्रहणानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करावी. माता लक्ष्मी धनाची दाता आहे आणि भगवान विष्णू सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. चंद्र देवतेची पूजा केल्याने कुंडलीतील त्याच्याशी संबंधित दोष दूर होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)