मुंबई, 07 नोव्हेंबर : धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण अशुभ मानले जाते, परंतु विज्ञानासाठी ही केवळ एक खगोलीय घटना आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण झाले होते. त्यानंतर त्यानंतर आता 8 नोव्हेंबरला 2022 रोजी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण. या दोन ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत, जी करण्यास मनाई आहे.
2022 च्या शेवटच्या काळात काही दिवसांच्या फरकाने दोन ग्रहण होणार आहेत. त्यापैकी सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर रोजी झाले. तर चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. या ग्रहणादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? काय करावे आणि काय करू नये? या विषयी भोपाळचे रहिवासी ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.
Chandra Grahan 2022 : सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण; या राशींवर होणार प्रतिकूल परिणाम
चंद्रग्रहण वेळ
चंद्रग्रहणाची तारीख : मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022
वेळ : दुपारी 1.32 ते संध्याकाळी 7.27 पर्यंत
ग्रहण काळात काय करावे?
- चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या आराध्य दैवताचे स्मरण करा आणि भजन कीर्तन करा.
- या दरम्यान कुटुंबासोबत बसून गायत्री मंत्राचा जप करावा.
- ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाका. असे केल्याने या गोष्टींवर ग्रहणाचा प्रभाव पडणार नाही.
- ग्रहण संपल्यानंतर तुळस मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे.
- ग्रहणानंतर स्नान करून दान करावे.
- ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसाचे पठण करावे.
चंद्रग्रहण काळात काय करू नये?
- धार्मिक मान्यतांनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
- ग्रहण काळात पूजा करू नये आणि मंदिराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत, असे सांगितले जाते.
- ग्रहण काळात व्यक्तीने झोपू नये.
Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा
- गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे. याचा त्यांच्या भावी बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- मान्यतेनुसार ग्रहणकाळात झाडांनाही हात लावू नये.
- ग्रहण काळात कोणत्याही व्यक्तीने तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू वापरू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandragrahan, Eclipse, Lifestyle, Moon, Religion