मुंबई, 8 नोव्हेंबर : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण पाटणा, रांची, दिल्ली, वाराणसी, महाराष्ट्रासह भारतातील सर्व ठिकाणांहून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण देशाच्या अनेक भागात अंशतः दिसणार आहे, तर पूर्वेकडील भागात ते स्पष्टपणे दिसेल. ठिकाण आणि वेळेनुसार, चंद्रग्रहणाच्या सुरुवातीच्या वेळेत थोडा फरक असू शकतो, परंतु बहुतेक ठिकाणी समाप्ती एकाच वेळी होईल.
मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाचा सुतक काळ 9 तास आधी सुरू होतो, त्यामुळे आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 09.21 पासून सुतक काळ सुरू झाला. मात्र स्थानानुसार, सुतक कालावधीच्या प्रारंभाच्या वेळेत थोडा फरक असू शकतो. यावेळी कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत आहे. आज आम्ही तुम्हाला चंद्रग्रहणाचा लाईव्ह टेलिकास्ट येथे दाखवत आहोत.
इथे पाहा चंद्रग्रहणाचा लाईव्ह टेलिकास्ट
महाराष्ट्रात यावेळी दिसेल चंद्रग्रहण
मुंबई : चंद्रोदय 06.01 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 18 मिनिटे
नाशिक : चंद्रोदय 5.56 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 23 मिनिटे
पुणे : चंद्रोदय 5.58 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 21 मिनिटे
कोल्हापूर : चंद्रोदय 05.59 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 20 मिनिटे
नागपूर : चंद्रोदय 5.32 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 47 मिनिटे
गडचिरोली : चंद्रोदय 5.30 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 49 मिनिटे
चंद्रपूर : चंद्रोदय 5.33 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 46 मिनिटे
बुलढाणा : चंद्रोदय 05.45 वाजता, चंद्रग्रहण कालावधी : 35 मिनिटे
सुतक काळात काय करावे आणि करू नये
- सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करू नका. असे केल्याने शुभ फळ मिळत नाही, अशी मान्यता आहे.
- सुतक काळात पूजा आणि धार्मिक कार्य बंद असतात. सुतक काळात मंदिरांचे दरवाजेही बंद केले जातात.
- सुतक काळात अन्न खाऊ नये.
Surya Grahan 2023 Date : आता सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग पुन्हा कधी येईल; इथं पाहा तारखा
- या काळात झोपणे देखील प्रतिबंधित आहे, परंतु रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध लोकांना यातून सूट देण्यात आली आहे.
- ग्रहण आणि सुतक काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून त्यांनी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandragrahan, Eclipse, Lifestyle, Live video, Moon