मराठी बातम्या /बातम्या /religion /चाणक्य नीतीने करा पैशांचे नियोजन, या 6 सवयींमुळे घरात येते गरिबी

चाणक्य नीतीने करा पैशांचे नियोजन, या 6 सवयींमुळे घरात येते गरिबी

चाणक्य म्हणतात की, जिथे स्त्रियांचा अनादर होतो, जिथे त्यांना प्रतिष्ठा नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही.

चाणक्य म्हणतात की, जिथे स्त्रियांचा अनादर होतो, जिथे त्यांना प्रतिष्ठा नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही.

चाणक्य म्हणतात की, जिथे स्त्रियांचा अनादर होतो, जिथे त्यांना प्रतिष्ठा नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 फेब्रुवारी:  महान गुरू चाणक्य सांगतात की, माणसाच्या काही छोट्या चुका असतात ज्या त्याच्या गरिबीचे कारण ठरतात. यामुळे लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि व्यक्तीला धनहानी सहन करावी लागते.

चाणक्यानुसार, जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतो, अशा घरात देवी लक्ष्मीची कृपा होत नाही. खरकटी भांडी चुलीच्या वर किंवा आजूबाजूला ठेवू नयेत. त्यामुळे गरिबी वाढते आणि व्यक्तीचा आदर कमी होतो.

चाणक्य म्हणतात की, जिथे स्त्रियांचा अनादर होतो, जिथे त्यांना प्रतिष्ठा नाही तिथे लक्ष्मी वास करत नाही. त्याच्या गैरवर्तनामुळे ती व्यक्ती आर्थिक संकटातून जात असते. मग तो श्रीमंत असो वा गरीब, माणसाची वाईट वागणूक, त्याची असभ्य भाषा त्याला गरिबीच्या मार्गावर घेऊन जाते.

चाणक्य नीती सांगते की, संध्याकाळी झाडू लावल्याने घरातील आशीर्वाद निघून जातात. संध्याकाळ म्हणजे माँ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ. सूर्यास्तानंतर झाडू लागल्यास कचरा घरातच ठेवावा.

चाणक्य म्हणतात की, ते लोक नेहमी आर्थिक संकटातून जातात, जे पैशाला महत्त्व देत नाहीत, जे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत. अशा लोकांच्या डोक्यावरून माता लक्ष्मीचा हात उचलला जातो.

पंचमुखी हनुमानाचं मंदिर तेही पाकिस्तानच्या कराचीत; मूर्तीचं आहे विशेष महत्त्व

कमावण्याच्या लालसेपोटी पैशाचा चुकीचा वापर करणे किंवा पैशाच्या जोरावर इतरांना त्रास देणे हे माणसाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणते. असा पैसा क्षणभर आनंद देऊ शकतो, पण नंतर सगळी पुंजी हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच थोड्या आनंदासाठी चुकीच्या मार्गावर जाऊ नका.

चाणक्य सांगतात की, जे नीट राहत नाहीत त्यांचा अर्थ असा होतो की ते त्यांचे काम उद्यासाठी पुढे ढकलतात, ज्यांची उठण्याची वेळ निश्चित नसते. असे लोक लवकर गरीब होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Acharya chanakya, Astrology and horoscope, Chanakya niti, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion