मराठी बातम्या /बातम्या /religion /पंचमुखी हनुमानाचं मंदिर तेही पाकिस्तानच्या कराचीत; मूर्तीचं आहे विशेष महत्त्व

पंचमुखी हनुमानाचं मंदिर तेही पाकिस्तानच्या कराचीत; मूर्तीचं आहे विशेष महत्त्व

पाकिस्तानच्या कराचीत आहे पंचमुखी हनुमानाचे मंदिर, थेट रामायणाशी संबंधित आहे इतिहास

पाकिस्तानच्या कराचीत आहे पंचमुखी हनुमानाचे मंदिर, थेट रामायणाशी संबंधित आहे इतिहास

पाकिस्तानच्या कराचीत आहे पंचमुखी हनुमानाचे मंदिर, थेट रामायणाशी संबंधित आहे इतिहास

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : अविभाजित भारतातील एक हनुमान मंदिर फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या भागात गेले. कराची शहरात असलेले हे पंचमुखी हनुमानाचे मंदिर अतिशय चमत्कारिक मानले जाते. हे मंदिर वेगळे आणि अद्वितीय आहे. कराचीतील या हनुमान मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिरातील पंचमुखी हनुमानाची मूर्ती हजारो वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.

प्रभू रामानेही या ठिकाणी एकदा भेट दिल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. या ऐतिहासिक मंदिरात हनुमानजींच्या दर्शनासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची गर्दी असते. हे मंदिर असलेल्या ठिकाणाहून 11 मूठ माती काढल्यानंतर ही पंचमुखी हनुमान मूर्ती प्रकट झाल्याचे मानले जाते. या मंदिराचा आणि 11 क्रमांकाचा खोल संबंध आहे. या मंदिरात हनुमानाच्या 11 परिक्रमा केल्याने भक्तांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

1882 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार

मान्यतेनुसार, हे मंदिर काही हजार वर्षे जुने आहे, परंतु आजच्या मंदिराचा इतिहास 18 व्या शतकाशी जोडलेला आहे. 1882 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

पंचमुखी हनुमान मंदिराच्या आसपास पाहण्यासारखी ठिकाणे

1. स्वामीनारायण मंदिर - कराचीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्वामीनारायण नावाचे मंदिर आहे.

2. माता मंदिर - कराचीतील हनुमान मंदिरापासून काही अंतरावर माता कालीचे मंदिर आहे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Hanuman mandir, Pakistan, Rashibhavishya, Rashichakra, Religion