मराठी बातम्या /बातम्या /religion /चैत्रातील दुर्गाष्टमीला अशी करा विधीवत पूजा; सुख-शांतीमध्ये नाही येणार बाधा

चैत्रातील दुर्गाष्टमीला अशी करा विधीवत पूजा; सुख-शांतीमध्ये नाही येणार बाधा

दुर्गा अष्टमीची पूजा

दुर्गा अष्टमीची पूजा

Chaitra Navratri 2023: नवरात्रीत अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी गौरीची पूजा परंपरेनुसार केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी काही कामे केल्याने देवी गौरीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

अयोध्या, 28 मार्च : चैत्र नवरात्रीत जगतजननी जगदंबेची पूजा केली जाते. हिंदू सनातन धर्मावर श्रद्धा असणारे लोक नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अयोध्येचे ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम यांनी सांगितले की, नवरात्रीत नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. चैत्र नवरात्रीत जगदंबेसोबत प्रभु श्रीरामाचीही पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. विशेषत: नवरात्रीतील महाअष्टमी (दुर्गा अष्टमी) या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

महाअष्टमीच्या दिवशी लोक तंत्र-मंत्र आणि ज्ञानप्राप्तीसाठी अनेक प्रकारचे तांत्रिक कार्य करतात. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, नवरात्रीच्या आठव्या दिवशी अष्टमी साजरी केली जाते. नवरात्रीत अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी गौरीची पूजा परंपरेनुसार केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी काही कामे केल्याने देवी गौरीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. दारिद्र्य नष्ट होते, सुख-समृद्धी प्राप्त होते.

दुर्गा अष्टमीला हे काम करा -

ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम सांगतात, कमळाचे फूल देवी दुर्गेला अतिशय प्रिय आहे, असे मानले जाते. महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मंदिरांमध्ये दुर्गेच्या चरणी 8 कमळाची फुले अर्पण करावीत. असे केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. याशिवाय दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करा, यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. एवढेच नाही तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आरती करावी. अष्टमी आणि नवमी तिथीला संध्याआरती करावी.

याशिवाय दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा. असे केल्याने ग्रह दोष आणि घरातील संकटांपासून मुक्ती मिळते. भाग्य चमकते. महाअष्टमीच्या दिवशी आणि रात्री दुर्गा मंदिरात सोळा अलंकार अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. जर तुमची आर्थिक स्थिती खराब होत चालली असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीला 11 लवंगा अर्पण करा.

हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Durgapuja, Navratri, Ram Navami 2023, Religion