जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Bali Pratipada 2022: दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? अशी सुरू झाली पूजेची परंपरा

Bali Pratipada 2022: दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? अशी सुरू झाली पूजेची परंपरा

Bali Pratipada 2022: दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? अशी सुरू झाली पूजेची परंपरा

Bali Pratipada 2022: बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि प्रत्येक कार्य सिद्धीस जाते, असे मानले जाते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 ऑक्टोबर : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बली पूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि प्रत्येक कार्य सिद्धीस जाते, असे मानले जाते. विशेषत: दक्षिण भारतात ओणमच्या वेळी राजा बळीची पूजा केली जाते. पण, उत्तर भारतात कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. तर महाराष्ट्रात यंदा दिवाळी पाडव्याला भाऊबीजे दिवशी बलिप्रतिपदा आहे. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, राजा बळी कोण होता आणि बलिप्रतिपदेचा सण का साजरा केला जातो? जाणून घेऊया दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा सण साजरा करण्यामागील महत्त्व काय आहे. बलिप्रतिपदा सणाचे महत्त्व - पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या म्हणण्यानुसार, हा सण भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाचा राक्षस राजा बळीवर विजय आणि पृथ्वीवर त्याच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. त्यामागे एक आख्यायिका देखील आहे, त्यानुसार एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे दोन पायऱ्यांमध्ये मोजमाप केले. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेवायचे असे विचारले तेव्हा बळीने त्याचे डोके पुढे केले होते. हे वाचा -  दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत असे मानले जाते की, बालीने आपले डोके वामनाच्या चरणी धरले आणि वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला. त्या वेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, प्रतिपदेला तुझी पूजा होईल आणि तो उत्सव म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो.

News18लोकमत
News18लोकमत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात