मराठी बातम्या /बातम्या /religion /

नीलम रत्नाचा या राशीच्या लोकांना होतो खास फायदा; धारण करताना अशा चुका टाळा

नीलम रत्नाचा या राशीच्या लोकांना होतो खास फायदा; धारण करताना अशा चुका टाळा

रत्न शास्त्रामध्ये प्रामुख्याने 9 रत्नांचा उल्लेख आहे. ज्यांना नवरत्न म्हणतात. आज भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या नवरत्नांपैकी एक असलेल्या नीलमबद्दल सांगत (Neelam Ratna) आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 ऑगस्ट : प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते आणि प्रत्येक ग्रहाचा व्यक्तीच्या कुंडलीवर प्रभाव पडतो, असे मानले जाते. हा परिणाम चांगला आणि वाईट असू शकतो. यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी रत्न घालण्याची शिफारस करतात. परंतु, रत्न धारण करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रत्न शास्त्रामध्ये प्रामुख्याने 9 रत्नांचा उल्लेख आहे. ज्यांना नवरत्न म्हणतात. आज भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या नवरत्नांपैकी एक असलेल्या नीलमबद्दल सांगणार (Neelam Ratna) आहेत.

नीलम कोणी घालावे?

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह चौथ्या, पाचव्या, दहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तो व्यक्ती नीलम रत्न धारण करू शकतो. नीलम रत्न शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. कुंडलीत सहाव्या किंवा आठव्या घरात शनि असेल तर त्यांच्यासाठीही नीलम रत्न धारण करणे शुभ असते. दुसरीकडे, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीचे लोक नीलम धारण करू शकतात.

नीलम रत्न परिधान करण्याचे फायदे -

नीलम रत्न हे शनि ग्रहाचे रत्न मानले जाते आणि जर कुंडलीत शनी शुभ परिणाम देत असेल असेल तर व्यक्तीची आर्थिक संकटे दूर होतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. जादूटोणा, काळी जादू, भुत-पिशाच्छ नीलम परिधान केलेल्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवू शकत नाहीत, नीलम धारण केल्याने व्यक्ती प्रामाणिक आणि कामाच्या बाबतीत मेहनती बनते.

हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश

नीलमणी कसा घालायचा -

शनिवार हा नीलम धारण करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. जाणकार ज्योतिषाच्या सल्ल्यानेच नीलम रत्न धारण करावे. नीलम नेहमी 5 ते 7.15 रत्तीपर्यंतच परिधान करावा. पंचधातुमध्ये नीलम धारण करण्याचा सल्ला दिला जातो. परिधान करण्यापूर्वी, नीलम दूध, गंगाजल आणि मधात घालून चांगले धुवा. त्यानंतर शनिदेवाच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटात नीलम धारण करा.

हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu