मुंबई, 17 सप्टेंबर : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात सदैव सुख, समृद्धी आणि आनंद राहावा. यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा संबंध राहू-केतू ग्रहांशी आहे. वास्तुशास्त्रानुसार जर हा ग्रह आपली नकारात्मक ऊर्जा देऊ लागला तर नुकसान होण्याची शक्यता असते. आपल्या स्वयंपाकघरात तवा आणि कडईचा सर्वात जास्त वापर होतो आणि वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कडई हे राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या भांड्यांबाबत स्वयंपाकघरात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा त्याबद्दल सविस्तर सांगत आहेत. वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा एकाच ठिकाणी ठेवावा. जिथं बाहेरच्या माणसाची थेट नजर पडणार नाही. याशिवाय तवा आणि कढई वापरल्यानंतर कधीही उलटे ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढई नेहमी तुमच्या गॅस किंवा स्टोव्हच्या उजव्या बाजूला ठेवावा. माता अन्नपूर्णा उजव्या बाजूला वास करते असे मानले जाते. तवा आणि कढईचा वापर झाल्यानंतर ते गॅसवर कधीही तसेच ठेवून देऊ नये. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढू शकतो. अन्न शिजवल्यानंतर नेहमी गॅसवरून तवा आणि कढई काढून थंड करा आणि नंतर चांगले धुवा. अन्नपदार्थ बनवल्यानंतर लगेच गरम तव्यावर किंवा कढईवर कधीही पाणी टाकू नये. असे मानले जाते की, असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येऊ शकतात आणि अशा व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही तव्यावर किंवा कढईवर अन्न शिजवणार असाल तर ती वापरण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडावे. असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात. हे वाचा - कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तव्यावर जी पहिली रोटी, पराठा किंवा पुरी बनवता ती शक्य असल्यास गायीला खाऊ घालावी. असे मानले जाते की, असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद राहतो. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







