मराठी बातम्या /बातम्या /real-estate /

तुम्हाला Home loan किती मिळेल? गृहकर्ज मिळण्यासाठीचे पात्रता निकष जाणून घ्या

तुम्हाला Home loan किती मिळेल? गृहकर्ज मिळण्यासाठीचे पात्रता निकष जाणून घ्या

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

कोणत्याही बॅंकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी काही नियम, अटी आणि निकष असतात. तुम्ही ते कसे तपासू शकता? Home loan calculator विषयी माहीत आहे का?

दिल्ली, 25 सप्टेंबर: स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या दृष्टीने प्रत्येक जण पैशांची तरतूद करत असतो. याकरिता काटेकोर आर्थिक नियोजन (Financial Planning) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक जण महिन्याच्या उत्पन्नातून काही रक्कम घराचं स्वप्न साकारण्यासाठी बचत म्हणून बाजूला ठेवत असतो. परंतु, सद्यस्थितीत घराच्या किमती पाहता या बचतीतून संपूर्ण रक्कम उभी करणं अशक्य असतं.

अशा वेळी गृहकर्ज (Home Loan) हा पर्याय दृष्टीक्षेपात येतो. आज खासगी, सरकारी आणि सहकारी बॅंका, तसंच अनेक वित्तीय संस्था गृहकर्ज देतात. प्रत्येक बॅंक किंवा वित्तीय संस्थेचे गृहकर्जासाठीचे नियम (Rules) वेगवेगळे आहेत. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी सद्य आर्थिक स्थिती, विविध आर्थिक योजना, भविष्यातल्या आपत्कालीन काळासाठी तरतूद, अन्य खर्च आदी गोष्टींचा बारकाईनं आढावा घेणं गरजेचं असतं. अशा वेळी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्लाही उपयुक्त ठरू शकतो.

SBI ग्राहकांसाठी खास भेट! केवळ 4 स्टेप्समधून मिळवा पर्सनल लोन

कोणत्याही बॅंकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी काही नियम, अटी आणि निकष असतात. यापैकी बहुतांश बाबी तुमचं मासिक उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसाय यांच्याशी निगडित असतात. त्यामुळे हे नियम, अटी आणि निकषांमध्ये आपण बसू शकतो की नाही याचाही विचार करावा लागतो. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही बसू शकत असाल तरच तुम्ही गृहकर्जासाठी पात्र ठरता.

गृहकर्जाची पात्रता कशी ठरते?

गृहकर्जासाठी पात्र ठरण्याकरिता काही गोष्टी करणं आवश्यक असतं. यासाठी तुमचा कर्ज परतफेड इतिहास चांगला असावा लागतो. त्याचबरोबर कोणतंही जुनं कर्ज किंवा परतफेड बाकी ठेवू नये. तसंच उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील राहणं फायद्याचं ठरतं. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, सर्व गोष्टींचा आढावा न घेता, सारासार विचार न करता गृहकर्जासाठी घाईत अर्ज करणं टाळावं. गृहकर्जासाठी पात्रता (Eligibility) निकष नेमके काय असतात, हे आता सविस्तर जाणून घेऊ या...

स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

गृहकर्जासाठीच्या पात्रता निकषांमध्ये सर्व बॅंका, तसंच नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांचे मापदंड काही प्रमाणात समान असतात. त्याशिवाय काही विशेष मापदंडदेखील असू शकतात, की जे प्रत्येक कर्जदारासाठी त्याच्या आवश्यकतांनुसार लागू होतात. बॅंकनिहाय कर्ज पात्रता निकष हे वेगवेगळेदेखील असू शकतात. कर्जदाराचं उत्पन्न, क्रेडिट प्रोफाइल आणि बँकेसोबतचे संबंध यावरही पात्रता निकष अवलंबून असतात.

गृहकर्जासाठी सर्वसाधारण पात्रता निकष असे -

- गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचं वय किमान 18 ते कमाल 70 वर्षापर्यंत असावं.

- वार्षिक उत्पन्न रोजगाराच्या प्रकारानुसार किमान 5 ते 6 लाख रुपये असावं.

- सिबिल क्रेडिट स्कोअर (Credit Score) 750च्या वर असावा.

- इच्छुक व्यक्ती नोकरदार किंवा व्यावसायिक असावी.

- कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.

- कर्ज रक्कम ही संबंधित बॅंक किंवा वित्तीय संस्था कर्जदाराची एकूण आर्थिक स्थिती आणि कालावधीनुसार ठरवते.

- तो भारताचा नागरिक किंवा अनिवासी भारतीय असावा.

Personal Loan, Credit Card आणि BNPL शॉपिंगसाठी कोणता पर्याय फायदेशीर?

- एलटीव्ही रेशो (LTV Ratio) 90 टक्क्यांवर असतो.

- पूर्णत्वास गेलेलं अथवा बांधकाम सुरू असलेल्या गृह प्रकल्पासाठी, स्वतःच्या जमिनीवर घरबांधणीसाठी, प्लॉट किंवा जमीन खरेदीसाठी किंवा जमीन खरेदी करून घरबांधणीसाठी गृहकर्ज घेता येतं.

काही प्रमुख बॅंकांचे 2021 या वर्षातले किमान पात्रता निकष असे आहेत -

- एचडीएफसी होम लोन (HDFC Home Loan) : गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्याचं वय 18 ते 70 वर्षादरम्यान असावं. कमाल गृहकर्ज कालावधी 30 वर्षांचा असेल. कर्जाची रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत असेल.

- एसबीआय होम लोन (SBI Home Loan) : गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्याचं वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असावं. कमाल गृहकर्ज कालावधी 30 वर्षांचा असेल. कर्जाची रक्कम किती असावी याचा निर्णय बॅंक घेईल.

- अॅक्सिस बँक होम लोन (Axis Bank Home Loan) : गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावं. गृहकर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षांचा असेल. कर्जाची रक्कम 3 कोटींपर्यंत असेल.

- एलआयसी एचएफएल होम लोन (LIC HFL Home Loan) : गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावं. गृहकर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षांचा असेल. कर्जाची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल.

- बॅंक ऑफ बडोदा होम लोन (Bank Of Baroda Home Loan) : गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचं वय 21 ते 70 वर्षांदरम्यान असावं. गृहकर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षांचा असेल. कर्जदाराला 10 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.

- कॅनरा बँक होम लोन (Canara Bank Home Loan) : गृहकर्जासाठी कर्जदाराचं वय 21 ते 55 वर्षांदरम्यान असावं. कर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षं असेल. कर्जाची रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत असेल.

- इंडियाबुल्स होम लोन (Indiabulls Home Loan) : गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचं वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावं. कर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षं असेल. कर्जदाराला पात्रतेनुसार 15 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.

- आयडीबीआय होम लोन (IDBI Home Loan) : गृहकर्जासाठी संबंधित इच्छुक कर्जदाराचं वय 22 ते 70 वर्षांदरम्यान असावं. कर्जासाठी कमाल कालावधी 30 वर्षं असेल. कर्जाची रक्कम 10 कोटींपर्यंत असेल.

तुमच्या बँकेतल्या अकाउंटचं Cash withdrawal limit किती असतं आणि ते कसं ठरतं?

याव्यतिरिक्त अनेक बॅंका आणि वित्तीय संस्था गृहकर्ज योजना राबवत आहेत. याविषयी सविस्तर माहिती संबंधित बॅंक किंवा वित्तीय संस्थेच्या शाखेत जाऊन, तसंच बॅंक किंवा वित्तीय संस्थेच्या वेबसाइटवरून घेता येईल. तसंच बॅंकांच्या वेबसाइटवरच्या पात्रता कॅल्क्युलेटरच्या (Calculator) मदतीनं कोणत्या बॅंकेची योजना तुमच्यासाठी योग्य आहे, हे तपासू शकता. या कॅल्क्युलेटरच्या मदतीनं तुम्ही बॅंकांच्या तपशीलाची तुलना करून गृहकर्जासाठी योग्य बॅंक निवडू शकता.

First published:

Tags: Home Loan, Property