मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal Loan, Credit Card आणि BNPL शॉपिंगसाठी कोणता पर्याय फायदेशीर? वाचा सविस्तर

Personal Loan, Credit Card आणि BNPL शॉपिंगसाठी कोणता पर्याय फायदेशीर? वाचा सविस्तर

Buy Now Pay Later हा पर्याय आजकाल अनेक ठिकाणी दिसून येतो. ट्रॅव्हल बुकिंग, फूड ऑर्डरिंग, राइड शेअरिंग, ऑनलाईन शॉपिंग किंवा ई-कॉमर्स व्यतिरिक्त, तुम्ही सर्विस वेबसाईटवर BNPL चा पर्याय मिळू शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 25 नोव्हेंबर : आता शॉपिंग (Shopping) करताना तुमच्याकडे पैसे नसले तरी देखील तुमची खरेदी थांबत नाही. कारण Buy Now Pay Later चा पर्याय आता ग्राहकांना (Customer) मिळतो. Buy Now Pay Later ही पद्धत आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्ही तुमच्या गरजांसाठी हा पर्याय स्वीकारावा का? हा एक मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर आज मिळू शकतं. याशिवाय, तुमच्या वैयक्तिक गरजा (Personal Requirements) पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डची सुविधा (Credit Card Service) असताना तुम्ही या BNPL पर्यायासाठी का घ्यावा  हे देखील तुम्हाला कळू शकेल.

पर्सनल लोन (Personal Loan) घेतल्यास ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात (Bank Account) येते आणि त्यानंतर तुम्ही हे पैसे लग्न, आजारावर उपचार, घर दुरुस्ती किंवा इतर कोणत्याही कामात खर्च करू शकता. बहुतेकदा या कर्जाची मुदत किंवा कार्यकाळ 1 ते 5 वर्षांच्या दरम्यान असू शकतो. तसेच जर आपण त्यावरचे व्याज पाहिले तर ते दरवर्षी 10 ते 20 टक्के दराने असू शकते. सोबतच हे देखील माहित असले पाहिजे की या कर्जाचा EMI वेळेवर न भरल्यामुळे, तुम्हाला मोठा दंड सहन करावा लागू शकतो आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.

Go Fashion IPO: तुमच्या खात्यात पैसे येणार की शेअर्स ते अशाप्रकारे तपासा, आज होणार अलॉटमेंट

Buy Now Pay Later नेमकं काय आहे?

Buy Now Pay Later हा पर्याय आजकाल अनेक ठिकाणी दिसून येतो. ट्रॅव्हल बुकिंग, फूड ऑर्डरिंग, राइड शेअरिंग, ऑनलाईन शॉपिंग किंवा ई-कॉमर्स व्यतिरिक्त, तुम्ही सर्विस वेबसाईटवर BNPL चा पर्याय मिळू शकतो म्हणजे नावाप्रमाणेच, आधी खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. तुम्ही त्याची परतफेड EMI द्वारे करू शकता किंवा नंतर पूर्ण रक्कम भरू शकता. तुम्ही BNPL वर शून्य व्याज EMI देखील मिळवू शकता. याद्वारे तुम्ही तुमचे अनेक खर्च भागांमध्ये विभागून तुमच्या एकरकमी खर्चाचा भार कमी करू शकता.

स्वस्तात घरखरेदी करण्याची संधी! या तारखेला PNB विकत आहे प्रॉपर्टी, तपासा डिटेल्स

वरील दोन्ही पर्यायांकडे लक्ष दिल्यास, तुम्ही क्रेडिट कार्ड आणि BNPL च्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह क्रेडिट कार्ड सुविधा घेऊ शकता. यामध्ये तुम्ही प्रथम क्रेडिटच्या आधारे खरेदी करता आणि नंतर तुम्हाला हे बिल भरण्यासाठी बराच वेळ दिला जातो. परंतु तुम्ही वेळेवर बिल भरण्यास सक्षम नसाल, तर थकबाकीची रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करून तुम्ही ती हळूहळू भरू शकता. 3 महिने ते 2 वर्षांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक असलेल्या पैशांवर अवलंबून आहे. पण हा एक खूप महाग सौदा असू शकतो ज्यावर तुम्हाला 20 टक्के पर्यंत जास्त व्याज द्यावे लागेल.

First published:

Tags: Money, Online shopping