मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या बँकेतल्या अकाउंटचं Cash withdrawal limit किती असतं आणि ते कसं ठरतं?

तुमच्या बँकेतल्या अकाउंटचं Cash withdrawal limit किती असतं आणि ते कसं ठरतं?

तुम्ही तुमच्या बँकेच्या बचत खात्यातून एका वेळी किती पैसे काढू शकता याला मर्यादा असते. तसंच एका दिवसात किती कॅश ट्रॅन्झॅक्शन करणार यासाठीही नियम असतात. तुम्हाला माहीत आहे का याविषयी?

तुम्ही तुमच्या बँकेच्या बचत खात्यातून एका वेळी किती पैसे काढू शकता याला मर्यादा असते. तसंच एका दिवसात किती कॅश ट्रॅन्झॅक्शन करणार यासाठीही नियम असतात. तुम्हाला माहीत आहे का याविषयी?

तुम्ही तुमच्या बँकेच्या बचत खात्यातून एका वेळी किती पैसे काढू शकता याला मर्यादा असते. तसंच एका दिवसात किती कॅश ट्रॅन्झॅक्शन करणार यासाठीही नियम असतात. तुम्हाला माहीत आहे का याविषयी?

  दिल्ली, 25 नोव्हेंबर: सध्याच्या काळात प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी खासगी, सरकारी किंवा सहकारी बँकेत सेव्हिंग (Saving) किंवा करंट अकाउंट (Current Account) असणं आवश्यक असतं. देशातील अर्थिक गैरव्यवहार, काळा पैसा, करचुकवेगिरीसारखे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात ठोस पावली उचलली आहेत. त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता राखणं गरजेचं आहे अन्यथा संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.

  का असते कॅश काढण्यावर मर्यादा?

  आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकार डिजीटल (Digital) किंवा ऑनलाइन (Online) व्यवहारांना प्राधान्य देत आहे. त्याचप्रमाणे सरकारने आर्थिक व्यवहारासाठी दैनंदिन, मासिक कॅश विड्रॉल (Cash Withdrawal) आणि कॅश ट्रान्झॅक्शनसाठी (Cash Transaction) काही मर्यादा (Limit) आखून दिल्या आहेत. त्यात एटीएमव्दारे कॅश विड्रॉल आणि बॅंक शाखेतून कॅश विड्रॉलसाठी मर्यादा या भिन्न आहेत. बचतीला प्रोत्साहन देणं हा खरं तर सेव्हिंग अकाउंटमागील उद्देश असतो.

  ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं?

  त्यामुळे या अकाउंटमध्ये तुम्ही पॅन कार्ड (Pan Card) सादर करून रक्कम जमा करू शकता. मात्र या खात्यावरून रोख रक्कम काढण्यावर काही मर्यादा असतात. तसेच कॅश ट्रान्झॅक्शनबाबतही काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. कॅश ट्रान्झॅक्शनसाठी असलेल्या मर्यादांचं पालन झालं नाही तर तुम्हाला संबंधित ट्रान्झॅक्शनवर 60 टक्क्यांपर्यंत कर (Tax) आकारला जाऊ शकतो. सेव्हिंग अकाउंटमधून कॅश विड्रॉल आणि कॅश ट्रान्झॅक्शनसंदर्भात नेमकी किती आणि कशी मर्यादा आहे, त्याची एकूण प्रक्रिया आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

  सेव्हिंग अकाउंट साठी कॅश विड्रॉल मर्यादा

  प्रत्येक बॅंकेचे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि बीएसडीए स्मॉल सेव्हिंग अकाउंटमधून कॅश विड्रॉल करण्याचे नियम आणि रकमेची मर्यादा या वेगवेगळया आहेत. तुम्हाला तुमच्या बॅंकेच्या शाखेतून स्लिपच्या सहाय्यानं थर्ड पार्टी पेमेंटसाठी (Third Party) 5000 रुपयांपर्यंत मर्यादा आहे. मात्र जर तुम्ही चेक, विड्रॉल स्लिप किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून कॅश विड्रॉल करत असाल तर त्यासाठी 10,000 ते 50,000 रुपयांची मर्यादा आहे. अर्थात ही मर्यादा संबंधित बॅंकेवर अवलंबून असते. एटीएम कार्डच्या माध्यमातून तुम्ही दररोज 10 हजार रुपये काढू शकता. तुमच्या बॅंकेव्यतिरिक्त अन्य एटीएममधून तीन वेळा मोफत तर त्यापुढील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले जाते.  जर तुमचे स्मॉल सेव्हिंग अकाउंट (Small Saving Account) असेल तर सामान्यतः तुम्हाला एका महिन्यात 8 वेळा कॅश विड्रॉल करता येते. त्यात 4 वेळा तुम्ही तुमच्या बॅंकेच्या शाखेतून पैसे काढू शकता तर 4 वेळा एटीएम मशीनच्या सहाय्याने विड्रॉल करू शकता.

  खासगी Cryptocurrencies म्हणजे काय? सार्वजनिक क्रिप्टोपेक्षा त्या वेगळ्या कशा

  काही प्रमुख बॅंकांच्या कॅश विड्रॉलसाठीच्या मर्यादा अशा – आरबीएल बॅंक – 50,000 ते 1.5 लाख रुपये, एचडीएफसी बॅंक 25,000 ते 1 लाख रुपये. अॅक्सिस बॅंक – 40,000 ते 3 लाख रूपये, कोटक महिंद्रा बॅंक – 40,000 ते 2.5 लाख, येस बॅंक – 25,000 ते 1 लाख रुपये, लक्ष्मी विलास बॅंक – 10,000 ते 1 लाख रुपये, इंडसलॅण्ड बॅंक – 50,000 ते 5 लाख रूपये.

  सेव्हिंग अकाउंटसाठी कॅश ट्रान्झॅक्शन मर्यादा

  भारतीय अर्थव्यवस्थेत कॅश ट्रान्झॅक्शन हा महत्त्वाचा भाग मानला जातो. कॅश ट्रान्झॅक्शन हा करचोरी, काळा पैसा (Black Money) तसेच अनेक आर्थिक गैरप्रकारांचा प्रमुख स्त्रोत असतो. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सेव्हिंग अकाउंटमधून कॅश ट्रान्झॅक्शन करण्याकरिता सरकारने आयकर कायद्यातंर्गत (Income Tax Law) काही मर्यादा खातेधारकासाठी आखून दिल्या आहेत. तसेच आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी डिजीटल पेमेंट किंवा ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. सुमारे 11 प्रकारचे मोठे ट्रान्झॅक्शन मानले जातात. या ट्रान्झॅक्शनवर आयकर विभागाची नजर असते. हे ट्रान्झॅक्शन करताना नियमांचं उल्लंघन झालं तर संबंधित बॅंक त्याची माहिती आयकर विभागाला देते. अशा व्यवहारांची छाननी आणि तुमच्या जुन्या आयकर तपशीलाशी त्याची तुलना केल्यावर आयकर विभाग तुम्हाला अशा ट्रान्झॅक्शनबाबत माहिती मागू शकते. एका महिन्यात 10 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट करणं, 10 लाखांवरील रकमेची एफडी करणं, एक लाखांपेक्षा जास्त रक्कम म्युचअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणं, 10 लाखांपेक्षा अधिक रकमेचं परकीय चलन (Foreign Currency) खरेदी करणं यांचा 11 प्रकारच्या मोठ्या ट्रान्झॅक्शन्समध्ये समावेश होतो. 10 लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार किंवा एका महिन्यात 10 लाखांपर्यंत केलेला एकत्रित व्यवहाराची माहिती बॅंक आर्थिक गुप्तचर विभागाला कळवू शकते. अशा वेळी तुमच्याकडे सबळ कारण किंवा योग्य कागदपत्रं नसतील तर कारवाई होऊ शकते.

  सरकारच्या अवाढव्य जमाखर्चाचा हिशेब कोण ठेवतं? एवढे पैसे येतात कुठून?

  काही प्रमुख बॅंकांची सेव्हिंग अकाउंटसाठी कॅश ट्रान्झॅक्शन मर्यादा अशी – आरबीएल बॅंक – 10,000 ते 3 लाख रुपये, एचडीएफसी बॅंक 2.75 लाख ते 3.5 लाख रुपये, अॅक्सिस बॅंक 1 लाख ते 6 लाख रुपये, कोटक महिंद्रा बॅंक – 50,000 ते 4.5 लाख रुपये, येस बॅंक – 1 लाख ते 3 लाख रुपये, इंडसइंड बॅंक – 50,000 ते 10 लाख रुपये.

  कॅश विड्रॉल आणि कॅश ट्रान्झॅक्शन या बाबी आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असल्या तरी नियमांच्या चौकटीत राहून त्या पूर्ण कराव्यात. कारण नियमबाह्य कॅश विड्रॉल किंवा कॅश ट्रान्झॅक्शन झाल्यास त्याची दखल आयकर विभागाकडून घेतली जाते आणि संबंधितावर कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता असते.

  First published:

  Tags: ATM, Personal banking