नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: तुम्ही या काळात घरखरेदीचा विचार करत असाल तर देशातील महत्त्वाची सरकारी बँक असणारी पंजाब नॅशनल बँक तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या पीएनबीने (PNB) खास ऑफर आणली आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Property Mega E-auction) प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात घरखरेदी (Buy Residential Property) करू शकता. ही ऑक्शन 26 नोव्हेंबर रोजी असणार आहे. ही अशी प्रॉपर्टी आहे जी डिफॉल्टमध्ये आली आहे. यात गुंतवणुकदारांना रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) ने याबाबत माहिती दिली आहे. हे वाचा- बँकाच्या खासगीकरणासाठी बँकिंग कायद्यात सुधारणा करण्याचं विधेयक मांडणार बँकेकडून विविध वेळी केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात. प्रॉपर्टी लिलावाबाबत अधिक माहितीसाठी https://ibapi.in/ या लिंकवर माहिती घेऊ शकता. E-Auction द्वारे प्रापर्टी खरेदी करायची असेल, तर बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेता येईल.
The best property in town is awaiting you.
— Punjab National Bank (@pnbindia) November 24, 2021
Participate in PNB's Mega e-Auction to get reasonable prices for residential and commercial property. To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyq#MegaEAuction pic.twitter.com/rKafhy5Slh
PNB ने ट्विटरवरुन दिली माहिती पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे. ट्वीटवर बँकेने असे म्हटले आहे की, मेगा ई-लिलाव 26 नोव्हेंबर, 2021 रोजी होईल. यात निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा लिलाव होईल. तुम्ही याठिकाणी वाजवी किंमतींत मालमत्ता खरेदी करू शकता. हे वाचा- पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर अधिक माहितीसाठी या लिंकवर करा क्लिक मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही https://ibapi.in/ या लिंकला भेट देऊ शकता. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्तेचे फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड, स्थान, मोजमाप आणि इतर माहिती दिली जाते. जर तुम्हाला ई-ऑक्शनद्वारे मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया आणि संबंधित मालमत्तेची कोणतीही माहिती मिळवू शकता.