Home /News /pune /

KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात, पुण्यातील घटना

KISS करताना रोखल्यानं भडकल्या तरुणी; केअर टेकरला मारहाण करत तोडला दात, पुण्यातील घटना

Crime in Pune: आपापसात किस करताना रोखल्यानं दोन मुलींनी केअर टेकरला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणींनी केअर टेकर महिलेचा दात देखील तोडला आहे.

    पुणे, 12 जुलै: दोन मुलींना आपापसात किस (2 Girl kissing each other) करताना रोखल्यानं एका वयोवृद्ध केअर टेकर महिलेला 4 जणांनी बेदम मारहाण (Caretaker beaten by 4) केल्याची घटना समोर समोर आली आहे. आरोपींनी मारहाण करत वृद्ध महिलेचा दात देखील तोडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन दिलं आहे. संबंधित घटना पुण्यातील (Pune) डी-अॅडिक्शन सेंटरमध्ये घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पुणे मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना चार महिन्यांपूर्वी पुण्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात घडली आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित वयोवृद्ध महिला दाताच्या उपचारासाठी मुंबईला गेली. उपचार करुन पुण्याला परत आल्यानंतर शनिवारी त्यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला पुण्यातील कृपा फाऊंडेशनच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या केअर टेकर होत्या. हेही वाचा-80 वर्षांच्या पतीची निघृणपणे हत्या; साखरेचं उकळतं पाणी अंगावर ओतलं 64 वर्षीय पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार,  19 फेब्रुवारी 2021 रोजी, सायंकाळी 5 च्या सुमारास पुण्यातील कृपा फाऊंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणी एकमेकांना किस करत होत्या. दरम्यान पीडित केअर टेकर महिला त्याठिकाणी आली. त्यांनी संबंधित दोन मुलींना एकमेकांना किस करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या तरुणींनी आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं केअर टेकर महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी पीडित महिलेचा दात देखील तोडला. हेही वाचा-आंतरजातीय विवाहाला विरोध, लग्नानंतर 28 वर्षांनी विवाहितेवर नातेवाईकांकडून हल्ला या घटनेनंतर पीडित महिला उपचारासाठी मुंबईला गेली. उपचार केल्यानंतर चार महिन्यांनी पीडित महिला पुन्हा पुण्यात आली आणि तिने संबंधित आरोपीविंरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 324, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटेनाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beating retreat, Crime news, Pune

    पुढील बातम्या