Home /News /crime /

आंतरजातीय विवाहाला विरोध, लग्नानंतर 28 वर्षांनी विवाहितेवर नवऱ्याच्या नातेवाईकांकडून हल्ला

आंतरजातीय विवाहाला विरोध, लग्नानंतर 28 वर्षांनी विवाहितेवर नवऱ्याच्या नातेवाईकांकडून हल्ला

28 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केलेल्या एका जोडप्याला नातेवाईकांकडूनच मारहाण (Inter-Caste Couple Attacked) झाली आहे. मुलाच्या घरचे स्वतःला उच्च जातीतील (Upper Caste) समजतात आणि याच कारणावरुन ही मारहाण झाली

पुढे वाचा ...
    बंगळुरू 12 जुलै : 28 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) केलेल्या एका जोडप्याला नातेवाईकांकडूनच मारहाण (Inter-Caste Couple Attacked) झाली आहे. मुलाच्या घरचे स्वतःला उच्च जातीतील (Upper Caste) समजतात आणि याच कारणावरुन ही मारहाण झाली आहे. ही घटना 8 जुलै रोजी घडली आहे. बंगळुरुपासून (Bengaluru) 385 किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटकमधील (Karnataka) गडाग जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. घटनेत पतीच्या घरच्यांनी केलेल्या मारहाणीत महिला जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. मात्र, या प्रकरणात नावांचा खुलासा करण्यास पोलिसांनी नकार दिला. पुण्यातील दत्तवाडी परिसरात कुख्यात गुंडाची हत्या, कोयत्याने सपासप वार करुन ठार ही महिला वाल्मिकी समुदायाची असून ती अनुसूचित जमाती म्हणून वर्गीकृत आहे. कर्नाटकमध्ये अल्पसंख्याकांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, अशातच आता ही घटना समोर आली आहे. कर्नाटक सरकारच्या आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत कर्नाटकातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (एससी / एसटी) समुदायाच्या लोकांची हत्या, शोषण आणि इतर सुमारे 2,327 प्रकरणे समोर आली आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यात 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी हा आकडा 1,504 इतका होता. यात हत्या, शोषण आणि जाळपोळ यासारख्या घटनांचा समावेश आहे. 80 वर्षांच्या पतीची निघृणपणे हत्या; साखरेचं उकळतं पाणी अंगावर ओतलं गेल्या महिन्याभरातच कर्नाटकात हत्येच्या घटना, गटा-गटांमधील वाद आणि इतर गुन्ह्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बंगळुरुपासून सुमारे 525 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजयपुरा जिल्ह्यातील देवरा हिप्परगी तालुक्यातील सलादहल्ली गावात एक अल्पवयीन जोडपं, दलित मुलगा आणि एक मुस्लीम मुलगी यांना मुलीच्या कुटुंबासह काही जणांनी ठार मारल्याची माहिती 24 जून रोजी समोर आली होती. या घटनांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं चिंतेत भर पडत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Karnataka, Marriage

    पुढील बातम्या