• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • लग्नाच्या 36 वर्षांनंतर 80 वर्षांच्या पतीची निघृणपणे हत्या; साखरेचं उकळतं पाणी अंगावर ओतलं

लग्नाच्या 36 वर्षांनंतर 80 वर्षांच्या पतीची निघृणपणे हत्या; साखरेचं उकळतं पाणी अंगावर ओतलं

पत्नीने अत्यंत क्रूरपणे पतीची हत्या केली. कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल

 • Share this:
  लंडन, 11 जुलै : ब्रिटनमधील एका महिलेने (woman in Britain) आपल्याच पतीवर उकळतं साखरेचं पाणी ओतून त्याची हत्या केली आहे. पती आपल्याचं मुलांचं लैंगिक शोषण (Child sexual abuse) करीत असल्याचा महिलेला संशय होता. त्यातून तिने पतीची हत्या केली. पती झोपलेला असताना तिने साखरेचं उकळतं पाणी त्याच्या अंगावर ओतलं. जळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात महिलेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 80 वर्षांच्या पतीवर ओतलं साखरेचं उकळतं पाणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव कोरिन्ना स्मिथ असून तिचं वय 59 वर्षे आहे. तिने गेल्या वर्षी 14 जुलै रोजी घरी झोपलेल्या अवस्थेत 80 वर्षीय पती मायकल बेन्स याची हत्या केली. ही महिला गेल्या 36 वर्षांपासून पतीसोबत राहत होती. मात्र मुलांबाबत ऐकल्यानंतर तिचा राग अनावर झाला व तिने साखरेचं उकळतं पाणी पतीवर ओतून त्याची हत्या केली. (The brutal murder of an 80-year-old husband after 36 years of marriage; Boiling water of sugar was poured on the body) 1 वर्षानंतर कोर्टाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा घटनेनंतर शेजारच्यांच्या मदतीने बेन्सला रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात दाखल झाल्याच्या 5 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. ज्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. एक वर्षे सुरू असलेल्या सुनावणीनंतर महिलेला दोषी मानत हत्येच्या गुन्ह्याखाली 12 वर्षांसाठी आजीवन कासावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हे ही वाचा-लेकीला Beauty Queen पर्यंत पोहोचविणाऱ्या आईची गळफास घेऊन आत्महत्या मुलांचं करीत होता लैंगिक शोषण लिव्हरपूल इकोतील बातमीनुसार, तिने सुनावणीदरम्यान कोर्टात सांगितलं की, हल्ल्याच्या एक दिवसापूर्वी पतीबाबत सुरू असलेल्या अफवेमुळे महिला चिंतेत होती. महिलेला तिच्या मुलीने सांगितलं की, मायकल बेन्स गेल्या अनेक वर्षांपासून आमचं लैंगिक शोषण करीत होते. घटनेच्या दिवशी महिला रागात होती, आणि पतीला मारण्यासाठी तिने बादलीभर पाणी आणि साखर मिसळून गरम केलं. पतीला जाळल्यानंतर महिला फरार जेव्हा महिलेचे पती झोपण्यासाठी अंथरुणावर पडले, तेव्हा महिलेने बादलीने उकळतं पाणी त्याच्या अंगावर ओतलं. पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महिला घर सोडून शेजारी पळाली. आणि आपणं केलेल्या कृत्याबाबत सांगितलं, घटनेची माहिती मिळताच पोलीस घरी दाखल झाली व जखमी मायकलला रुग्णालयात दाखल केलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: