मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

आता कायमचं जग सोडतो! Whatsapp स्टेटस ठेवून तरुण गायब, पुणे पोलिसांकडून रात्रभर शोधाशोध

आता कायमचं जग सोडतो! Whatsapp स्टेटस ठेवून तरुण गायब, पुणे पोलिसांकडून रात्रभर शोधाशोध

पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्येचं संकेत देणारं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून गायब झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्येचं संकेत देणारं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून गायब झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्येचं संकेत देणारं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून गायब झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 01 ऑक्टोबर: पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्येचं संकेत देणारं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवून गायब झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्हॉट्सअॅप स्टेट्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पुणे पोलीस खडबडून जागं झालं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्या तरुणांकडून संबंधित तरुणाची रात्रभर शोधाशोध केली आहे. संबंधित तरुणाचा मोबाइल बंद असल्याने शोध घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता तो सापडला आहे.

पुष्कर काळे असं संबंधित तरुणाचं नाव असून तो पुण्यातील कर्वेनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पुष्करनं 'शेवटी वेळ आलीच, आता कायमचं जग सोडतोय, गुड बाय' अशा आशयाचं व्हॉट्सअॅप ठेवलं होतं. तरुणाने हा स्टेट्स ठेवल्यानंतर त्याच्या मित्र परिवरात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा-जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! पित्यानेच पोटच्या लेकराला नदीत फेकलं

या घटनेनंतर अनेकांनी पुष्करच्या घराकडे धाव घेतली पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर काहींनी पुणे पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पुष्करची रात्रभर शोधाशोध केली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते तरुण देखील पुष्करला शोधण्यासाठी पोलिसांची मदत करत होते. तर अनेक तरुणांनी सोशल मीडियावर माहिती शेअर करत पुष्करचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता पुष्कर सापडला असून तो सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-पुणे: पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड

याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी पुष्करशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. तसेच त्याच्या कुटुंबीयांकडे आणि मित्र मैत्रिणींकडे देखील याबाबत चौकशी केली जात होती. स्टेटस ठेवल्यानंतर पुष्कर फोन बंद करून गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. या घटनेचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune