मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड, पुण्यातील धक्कादायक घटना

पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड, पुण्यातील धक्कादायक घटना

file photo

file photo

Murder in Pune: पुण्यातील हडपसर परिसरात एका व्यक्तीने आपल्या मित्राला जिवंत जाळून (accused set his friend on fire) निर्घृणपणे हत्या (Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 01 ऑक्टोबर: पुण्यातील (Pune) हडपसर परिसरात एका व्यक्तीने आपल्या मित्राला जिवंत जाळून (accused set his friend on fire) निर्घृणपणे हत्या (Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्राला उसने पैसे देणे संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. उसन्या पैशावरून झालेल्या वादानंतर (argument over borrowed money) आरोपीनं आपल्या मित्राने केलेल्या मदतीची भयंकर पद्धतीने परतफेड केली आहे. या दुर्दैवी घटनेत भाजलेल्या व्यक्तीने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Accused friend arrest) केली आहे.

संतोष दादाराव कागदे असं हत्या झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. तर मनोज मोहन कांदे असं अटक केलेल्या आरोपी मित्राचं नाव असून तो फुरसुंगी परिसरातील संकेत विहार येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कागदे यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी कांदे याला काही पैसे उसने दिले होते. पैसे उसने घेऊन बऱ्याच दिवसांपासून आरोपी पैसे परत देत नव्हता.

हेही वाचा-रात्री आईला बोलून दाखवली खंत, सकाळी आढळला मृत, MPSCच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

यामुळे मृत संतोष कागदे आणि आरोपी मनोज कांदे यांच्या वाद होऊ लागला. उसन्या पैशांवरून दोघांत अनेकदा वाद झाला. दरम्यान गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दोघंही फुरसुंगीतील संकेत विहार परिसरात एका विहिरीजवळ भेटले. याठिकाणी दोघांत पुन्हा उसन्या पैशांवरून वाद झाला. यावेळी  संताप अनावर झाल्याने आरोपी मनोज याने संतोष यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवलं.

हेही वाचा-व्यायाम करताना घडलं भलतंच; सांगलीत बड्या डॉक्टरचा जिममध्येच मृत्यू

या दुर्दैवी घटनेत संतोष कागदे गंभीररित्या भाजले. यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कागदे यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कागदे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी मनोज कांदे याच्याविरोधात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune