जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! निर्दयी पित्याने पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं

जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! निर्दयी पित्याने पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं

Crime in Kolhapur: कोल्हापुरात एका हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निर्दयी पित्याने आपल्या 5 वर्षाच्या पोटच्या लेकराला थेट नदीत फेकलं (father threw 5 years old child into Panchganga river ) आहे.

  • Share this:

इचलकरंजी, 01 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे एका हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निर्दयी पित्याने आपल्या 5 वर्षाच्या पोटच्या लेकराला थेट नदीत फेकलं (father threw 5 years old child into Panchganga river ) आहे. आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर, ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून मुलाचा शोध घेतला जात आहे. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा अशाप्रकारची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सिकंदर हुसेन मुल्ला असं अटक केलेल्या 48 वर्षीय आरोपी वडिलांचं नाव आहे. तर अफान सिकंदर मुल्ला असं नदीत टाकलेल्या मुलाचं नाव आहे. आरोपी सिकंदर मुल्ला हा अपंग असून मिळेल तिथे मजुरीचं काम करतो. त्याला एका दहा वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. पण 5 वर्षीय मुलगा अफानला फिट्स येण्याचा आजार आहे. मागील काही दिवसांपासून अफानवर उपचार सुरू होते. पण त्याच्या उपचाराचा आणि गोळ्या औषधांचा खर्च खूप जास्त होता. हा खर्च सिकंदरला झेपत नव्हता (can't afford medical expenditure), त्यामुळे घरी नेहमी वाद व्हायचा. त्यामुळे ते जास्तीत जास्त घराबाहेर राहायचा.

हेही वाचा-घरी अठरा विश्वे दारिद्र्य, गरिबीला कंटाळून दहावीतील मुलीचं भयावह पाऊल

पण दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मेहुण्याने त्याला शोधून घरी आणलं आणि मुलाच्या उपचाराच्या खर्चावरून त्याची कान उघडणी केली. बायको आणि मेहुण्याने केलेला अपमान सिकंदरच्या जिव्हारी लागला होता. यामुळे तो गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उपचार करण्यासाठी जात असल्याचा बहाणा करत मुलगा अफानला घेऊन घराबाहेर गेला. रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचं नातेवाईकांना सांगितलं. काही वेळ नातेवाईकांचाही त्याच्यावर विश्वास बसला नाही.

हेही वाचा-पतीच्या निधनानंतर 8 दिवसात हरली हिंमत, विवाहितेनं चिमुकलीसह केला हृदयद्रावक शेवट

पण बराच काळ शोधूनही मुलगा सापडत नसल्याने नातेवाईकांनी आरोपी वडील सिकंदरला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. याठिकाणी आरोपी वडिलानं आपल्या गुन्ह्याची कबुली देत. मुलाला पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीत फेकल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मुलाचा शोध घेतला. पण मुलगा काही सापडला नाही. काळोखामुळे पोलिसांनी शोधमोहीम थांबवली आणि शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध सुरू केला आहे.

Published by: News18 Desk
First published: October 1, 2021, 12:08 PM IST

ताज्या बातम्या