पुणे, 20 ऑक्टोबर: पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या (Brother brutal murder) केली आहे. आरोपी तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची झोपलेल्या जागीच पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या (slit throat with fan blade) केली आहे. ही अमानुष घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं, घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या (Accused brother arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बाबू ऊर्फ प्रदीप शिवाजी गवळी असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो हडपसर परिसरातील पंधरा नंबर गल्ली येथील रहिवासी आहे. तो मुळचा तूळजापूर येथील रहिवासी असून पुण्यात आपला मोठा भाऊ आणि वहिनीसोबत वास्तव्याला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 28 वर्षीय भावाचं नाव मनोज शिवाजी गवळी असून तो ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्याचं काम करतो. तर मृत भाऊ प्रदीप हा रिक्षाचालक असून त्याला विविध प्रकारचे व्यसनं होती.
हेही वाचा-पत्नीच्या पूर्ण शरीरावर केले चाकूने वार अन्...; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
त्यामुळे तो रिक्षा चालवून मिळालेला सर्व पैसा विविध व्यसनांसाठी खर्च करायचा. स्वत: जवळील पैसे संपल्यानंतर मृत प्रदीप आपला भाऊ मनोजकडे पैशांची मागणी करायचा. सतत प्रदीपला पैसे देऊन मनोजच्या मनात त्याचाविषयी रोष निर्माण झाला होता. दुसरीकडे, प्रदीप हा त्यांच्यासोबत राहतो, हे मनोजच्या पत्नीला आवडत नव्हतं.
हेही वाचा-बहिणीच्या अनैतिक संबंधातून निरागस भावाची हत्या; विचित्र घटनेनं नागपूर हादरलं!
दरम्यान, मनोजची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. तसेच मोठा भाऊ मनोज गवळी आपला धाकटा भाऊ प्रदीप याच्या व्यसनांना कंटाळला होता. यातून त्याने घरी कोणी नसताना, प्रदीपची निर्घृण हत्या केली आहे. सोमवारी रात्री मृत प्रदीप गाढ झोपी गेला असताना, आरोपी मनोजने पंख्याच्या पात्याने गळा चिरून त्याचा खून केला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी भाऊ मनोजला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pune