• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पत्नीच्या पूर्ण शरीरावर केले चाकूने वार अन्...; निर्घृण कृत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पत्नीच्या पूर्ण शरीरावर केले चाकूने वार अन्...; निर्घृण कृत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

फोटो सौजन्य : द सन

फोटो सौजन्य : द सन

कशिश अग्रवालने आपली पत्नी गीतिका गोयल हिची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या केली. यानंतर पत्नीचा मृतदेह घरापासून लांब नेत त्यानं याची विल्हेवाट लावली

 • Share this:
  लंडन 19 ऑक्टोबर : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे (Life Imprisonment to a Indian Man). या व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली (Husband Brutally Killed Wife). या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचं नाव कशिश अग्रवाल असं आहे. 28 वर्षीय कशिश अग्रवाल यानं आपल्या 29 वर्षीय पत्नी गीतिका गोयल हिची घरातच हत्या केली. यानंतर त्यानं आपली पत्नी हरवली असल्याचं नाटक रचलं. मात्र, त्याचं पितळ लवकरच उघडं पडलं. द सनने दिलेल्या वृत्तानुासर, इंग्लंडच्या Leicester मध्ये राहणाऱ्या कशिश अग्रवालने आपली पत्नी गीतिका गोयल हिची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या केली. यानंतर पत्नीचा मृतदेह घरापासून लांब नेत त्यानं याची विल्हेवाट लावली. यानंतर त्यानी आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना फोन करून गीतिकाबद्दल चौकशी केली. त्यानं म्हटलं की जेव्हा तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा घरात त्याला गीतिका दिसली नाही. यानंतर पोलिसांत गीतिका बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. VIDEO: पत्नीसोबत भांडणानंतर आला राग, संतापलेल्या पतीने 10 घरांना लावली आग आपल्या पत्नीचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला आणि कारमध्ये ठेवून आपल्यासोबत नेला. त्यानं घरापासून काही अंतरावर जात मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि घरी परत आला. याआधी त्यानं गीतिकाच्या फोनवर अनेक कॉल केले. जेणेकरून पोलिसांना सांगू शकेल की आपली पत्नी सापडत नसल्यानं तो फार चिंतित होता. त्यानं पोलिसांना सांगितलं, की ऑफिसमधून आल्यानंतर तो सरळ अंघोळीसाठी गेला. जवळपास अर्ध्या तासानं त्याच्या लक्षात आलं की गीतिका घरी नाही. यानंतर त्यानं गीतिकाला कॉल केला मात्र तिनं उचलला नाही.
  आरोपी पती
  या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची ओळख गीतिकाच्या नावाने पटली. तिच्या संपूर्ण शरीरावर चाकूचे वार होते. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना कशिशवर संशय आला आणि त्यांना चौकशी सुरू केली. चौकशीत सत्य समोर आलं. पोलिसांनी कशिशच्या घरातील आणि शेजारीच सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात तो ज्या दिवशी हत्या झाली त्यादिवशी कारने कुठेतरी जाताना दिसला. याशिवाय घरात पोलिसांना रक्ताचे डागही दिसले. अखेर 7 दिवसांनी राजन शिंदेचा मारेकरी सापडला; नेमकं काय घडलं त्या रात्री? Leicester Crown Court ने १८ ऑक्टोबरला या प्रकरणावर निर्णय सुनावत कशिश अग्रवालला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला २० वर्ष आणि सहा महिने तुरुंगात राहावं लागेल. या हत्येनंतर गीतिकाचे कुटुंबीय सदम्यात आहेत. कशिश गीतिकाची हत्या करू शकतो, यावर विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: