मराठी बातम्या /बातम्या /पुणे /प्रायव्हेट पार्टवर लाथ मारत शेजाऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना

प्रायव्हेट पार्टवर लाथ मारत शेजाऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Pune: पुण्यातील घोरपडी परीसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.

पुणे, 05 नोव्हेंबर: पुण्यातील घोरपडी परीसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. आरोपीनं अश्लील शब्दांत अपमानास्पद बोलून तिच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली (young man kicked on minor girl's private part) आहे. या संतापजनक घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी नराधमाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपी तरुण हा सराईत गुन्हेगार असून गुन्हा दाखल होताच, तो फरार झाला आहे. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे.

आदिल सुलतान शेख असं गुन्ह दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो पुण्यातील घोरपडी परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO), विनयभंग (Molestation) आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-पुणे: CID पाहून रचला कट; संधी मिळताच वृद्ध महिलेचा गेम, थरारक घटनेचं उलगडलं गूढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास नराधम आरोपीनं 12 वर्षीय पीडित मुलीला अश्लील शब्दात शिवीगाळ केली आहे. आरोपीनं पीडितेला 'तेरे कपडे उतारके नंगा करूंगा' अशा शब्दात अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आहे. नराधम आरोपी एवढ्या वरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारून तिला जखमी केलं आहे.

हेही वाचा-मृत्यूच्या 1 तासआधी आईशी शेवटचं बोलली; ऐन दिवाळीत विवाहितेनं उचललं भयावह पाऊल

ही संतापजनक घटना समोर येताच पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करताच, आरोपी फरार झाला आहे. आरोपी आदिल हा सराईत गुन्हेगार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune