पुणे, 11 जुलै: कंपनीनं आईला कामावरून काढून टाकल्याच्या (Company fired mother) रागातून एका तरुणानं अन्य काही तरुणांच्या मदतीनं कंपनीत जाऊन कंपनीतील व्यवस्थापकाला मारहाण (Beat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीत शिरलेल्या तरुणांनी हातात कोयता (Scythe) घेऊन कंपनीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरातील औद्योगिक कंपनीत घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक (5 Arrest) केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सागर मुकूंद अहिरराव, चेतन किशोर पाटील, विकास राजेंद्र जानकर, केतन गंगाराम मोरे, राजेश संभाजी चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर श्रीधर नायडू (वय 62, वानवडी) असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हेही वाचा- मियां बीवी राजी, घरचेही सहमत; लव्ह जिहादचा रंग देत कपलला बाहेरच्यांकडून धमक्या सामना नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सागर अहिरराव याची आई कोंढव्यातील टाईनीग को. औद्योगिक कंपनीत कामावा होती. पण याठिकाणी काम करणाऱ्या अन्य सहकारी महिलांसोबत आरोपीच्या आईचं पटत नव्हतं. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकानं आरोपी सागर अहिरराव याच्या आईला कामावरून काढून टाकलं. याचा राग मनात धरून आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं कंपनीत जाऊन कंपनी व्यवस्थापक श्रीधर नायडू यांना कोयत्यानं मारहाण करत त्यांना जखमी केलं. हेही वाचा- OYO हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरुण-तरुणी आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कंपनीतील तीन केबीनच्या काचा फोडून नुकसान केलं. याशिवाय हातातील कोयता हवेत फिरवून कंपनीतील कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक श्रीधर नायडू यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा सागर अहिरराव याच्यासह अन्य चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित पाच जणांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.