दिल्ली, 11 जुलै: देशभरात सेक्स रॅकेटचं वाढलेलं जाळ तोडण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले जात आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. (Sex racket at Oyo Hotel) दरम्यान ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील OYO हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी ओयो हॉटेलवर छापेमारी केली. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हॉटेलचे मालक ऋषी गोयलला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या सेक्टर 36 मधील ग्रेनो कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर ओयो हॉटेल सुरू होतं. शनिवारी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी ओयो हॉटेलमध्ये छापा मारला. या वेळी दोन तरुण आणि एका तरुणीला अटक करण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले एक तरुण ग्रेटर नोएडाचा राहणारा असून दुसरा बुलंदशहरमधील सिंकदराबाद येथे राहतो. हे ही वाचा- नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार यांच्याकडून 4 मोबाइल फोन 6900 रुपयांची कॅश, दोन डिवीआर, रजिस्टर, ग्राहक फॉर्म आणि आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आलं. ओयो हॉलेटचा मालक ऋषी गोयल यालाही ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी नोएडामधील अवैध गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.