जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मधुमेह आजाराला कंटाळून एकाने घेतला गळफास, पुण्यातील धक्कदायक घटना

मधुमेह आजाराला कंटाळून एकाने घेतला गळफास, पुण्यातील धक्कदायक घटना

 गणेशने घरातून निघून जात असताना, 'मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात आहे' अस म्हटलं होतं.

गणेशने घरातून निघून जात असताना, 'मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात आहे' अस म्हटलं होतं.

गणेशने घरातून निघून जात असताना, ‘मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात आहे’ अस म्हटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 08 मे : मधुमेह सारखा (diabetes) आजार झाल्यावर अनेक पथ्यांचं काटेकोरपणे पालन करावे लागते. मधुमेह आजारातून लवकरात लवकर कशी सुटका होईल यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात मात्र  मधुमेहाच्या आजाराला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची (commits suicide) धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गणेश मनिकम असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेश बेपत्ता होते.  तशी तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी नोंदवली होती तर दुसरीकडे गणेशने घरातून निघून जात असताना, ‘मी आजाराला कंटाळून आत्महत्या करायला जात आहे’ अस म्हटलं होतं. मात्र यावेळी परिवारातील सदस्यांनी गणेश मणिकम याला अडवण्याचा प्रयत्न ही केला होता. परंतु तो निष्फळ ठरला होता.

 ( ‘एका पठ्याला माझ्याविरोधात…’, अजितदादांनी ठेवलं पडळकरांच्या जखमेवर बोट! )

घर सोडून जाताना त्याने एक दोरी ही सोबत घेतल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं. यावरून देहूरोड पोलिसांनी गणेशने आत्महत्या केल्याचं अंदाज वर्तवला आहे. ( CSK चा माजी कर्णधार रवींद्र जडेजा याला DC विरुद्ध संघाबाहेर बसवण्यात आलंय! ) आज जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अमरदेवीच्या डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह झाडाला आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे. गणेशने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू दरम्यान, मावळात शिरगाव पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दिलीप बोरकर असं निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते शिरगाव चौकीत कार्यरत होते. आज सकाळपासूनच त्यांना बर नव्हतं, दुपारी सहकारी पोलिसांन सोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने चौकीतच झोपले, काही वेळाने त्यांना सहकाऱ्यांनी उठवलं पण ते बेशुद्ध अवस्थेत होते. लगेच पोलीस मित्रांनी खासगी रुग्णालयात हलविले तर तिथं त्यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं पुढं आलं. या घटनेमुळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात