मुंबई, 8 मे : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात मुंबईतील डी वाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नईचं कर्णधारपद अनुभवी महेंद्रसिंग धोनी सांभाळत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मोठा धक्का बसला आहे, कारण माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सामन्यात खेळू शकला नाही. नाणेफेक दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या प्लेइंग-11 मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. शिवम दुबे परतला आहे, तर रवींद्र जडेजा बाहेर बसला आहे. रवींद्र जडेजा अनफिट असल्याने त्याला बाहेर बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने क्षेत्ररक्षण करताना डायव्ह मारली होती, त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला वेदना होत होत्या. मात्र, काही वेळाने तो पुन्हा मैदानात उतरला होता. Chris Gayle on IPL 2022: ..म्हणून यंदाच्या IPL मध्ये खेळलो नाही, ख्रिस गेलचा धक्कादायक खुलासा पण आता चेन्नई सुपर किंग्जने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तसंही चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहे, अशा स्थितीत मोठ्या खेळाडूला बाहेर बसवल्याने संघाला फारसा फरक पडणार नाही. रवींद्र जडेजा सुरुवातीला कर्णधार रवींद्र जडेजाबद्दल बोलायचं झालं, तर या मोसमाच्या सुरुवातीला तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता, पण त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खराब झाली होती. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या हाती कमान देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ‘या’ अनकॅप्ड गोलंदाजावर फिदा! म्हणाला हा तर भारतीय संघाचं भविष्य कर्णधारपद मिळाल्यानंतर खुद्द रवींद्र जडेजाही खराब फॉर्मशी झुंजत होता. रवींद्र जडेजा या मोसमात अवघ्या 10 सामन्यांत 116 धावा करू शकला आहे. गोलंदाजीतही तो अपयशी ठरला आणि केवळ 5 विकेट घेऊ शकला. चेन्नई सुपर किंग्ज ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, ड्वेन प्रिटोरियस, महेश थेक्षना, मुकेश चौधरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.