सातारा, 08 मे : ‘मागे विधानसभेत माझ्या विरोधातही एक पठ्या आणला होता. पण, बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त करून घरी पाठवले’, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यावर निशाणा साधला. साताऱ्यातील वाढे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. ’ लोकसभेच्या निवडणुकीत खासदाराचे एकाला तिकिट दिले ( उदयनराजे भोसले खासदार असताना ) आणि मी बाळासाहेबांना डोळा मारला आणि ते उभारले आणि निवडून आले. पण नंतर ते भाजपात गेले आणि त्यांना सातारकरांनी घरी बसवलं होतं. मागे विधानसभा निवडणुकीत सुधा माझ्या विरोधातही एक पठ्या आणला होता. पण, बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त करून घरी पाठवले, असं म्हणत अजितदादांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सणसणीत टोला लगावला. ‘कधी सांगतात टोल बंद करा. कधी सांगतात यूपी बिहार लोकांना हाकला. कसली नौटंकी सुरू आहे. आता मशिदीवर भोंग्याचा मुद्या काढला. आता हे अयोध्येला चालले आहे. पण यांनी आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं. भोंगे या अगोदर दिसले नाहीत का? यांच्या या भूमिकेने साई मंदिरातील काकड आरती बंद झाली, अशी टीकाही अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली. ( मोठी बातमी! NEET PG परीक्षेसंदर्भातील ‘ते’ परिपत्रक Fake; या तारखेला होणार Exam ) काहींनी सांगितलं मुख्यमत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायची आहे.. काय नडलं आहे. तुझ्या घरासमोर म्हण ना. उद्धव ठाकरे यांच्या नावावर ते निवडूण आले आणि आता त्यांच्या घरासमोर ड्रामा करताय, असं म्हणत अजित पवारांनी राणा दाम्पत्यांना सणसणीत टोला लगावला. ‘महाराष्ट्रातील वातावरन बिघडले तर मोठे गुंतवणूकदार उद्योगपती जातील. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. पण यावर कोण बोलत नाही. सर्व चॅनलवर कोण कुठ गेले. सरकार ज्यांनी निवडून आणले त्यांना कुणी विचारत नाही, असंही अजितदादा म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.