पुणे, 08 मार्च : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लाल मातीत सराव करत असताना एका पैलवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पैलवानाच्या अकाळी निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील पाडाळे (वय ३१) असं मृत पैलवनाचे नाव आहे. आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही घटना घडली. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचे आज आकस्मित निधन झाले.
(कोल्हापुरात राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवली)
स्वप्निल हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक व्यायाम करताना खाली पडला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमीतील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
(शालीवरून झाला पुण्यातील चिमुरडीच्या हत्येचा उलगडा; प्रियकराला त्रास होतो म्हणून आईनेच...)
अधिक माहितीनुसार, स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune