शिरुर, 25 मे: राज्यात कोरोमानं थैमान घातलं आहे. नागरिकांमध्ये सध्या मोठी भीती पसरली असताना पुणे जिल्ह्यात एक भयानक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय विवाहितेनं मृत्यूला कवटाळलं आहे. आपल्या 3 वर्षांच्या लेकीला कंबरेला बांधून या महिलेनं पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
हेही वाचा.. खिसे तपासण्यावरून भाविकाची हत्या, रक्तानं माखलेल्या कपड्यात शिवसेना नेता अटकेत
पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथे मायलेकीने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची ही घटना सोमवारी उघडकीस आली. सपना कसबे (रा.सणसवाडी) असं मृत महिलेचं नाव आहे. चिमुरडीचं नाव समजू शकलं नाही.
महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला ओढणीच्या सहाय्याने कंबरेला बांधून पुणे-नगर महामार्गावरील भीमा नदीवरील पुलावरून पाण्यात उडी मारली. यात या महिलेचा व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी या मायलेकीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
हेही वाचा...पडद्यामागे मोठ्या हालचाली? शरद पवारांच्या पाठोपाठ राणेही राज्यपालांना भेटणार
महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र कौटुंबिक वादातून महिलेनं आपल्यामुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.