कल्याण, 25 मे: खिसे तपासणीवरुन झालेल्या वादातून एका भाविकाची मारहाणीत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणीत शिवसेनेच्या एका नेत्याची नाव समोर आलं आहे. शिवसेना शाखाप्रमुख जितेंद्र पाटील यांना पोलिसांनी चक्क रक्तानं माखलेल्या कपड्यात अटक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
हेही वाचा.. ही घडी टीका- टिप्पणीची नव्हे, राष्ट्रवादीकडून पियूष गोयल यांच्या कामाचे कौतुक
घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलमुळे लागला छडा...
पोलिसांनी दिलेला माहिती अशी की, मलंगगडाच्या पायथ्याशी खिसे तपासण्यावरून वाद होऊन काही जणांमध्ये हाणामारी झाली. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत एका भाविकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. मात्र, आरोपी कितीही सराईत असला तरी मागे काही ना काही पुरावा ठेवतच असतो. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल फोन सापडला. शिवसेना शाखा प्रमुख जितेंद्र पाटील यांचा हा मोबाईल फोन असल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांनी जितेंद्र पाटील अटक केली आहे. यावेळी जितेंद्र पाटील यांचे कपडे रक्तानं माखलेले होते. त्यामुळे त्यांच्यावरचा पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहे.
हेही वाचा...मोठी बातमी! कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्राने मागितली केरळकडे मदत
दुसरीकडे, दिव्यातील आगासन रोडवर फायरिंग झाल्याची माहिती मिळाली आहे. वाद झाल्याने डोंबिवली आकाश पाटील नामक व्यक्तीने दिवामधील एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी रात्रीची ही घटना असून 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून यात कोणीही जखमी झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.