मुंबई, 25 मे: राज्यात कोरोनानं अक्षरश: कहर केला असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. आता भाजपचे खासदार नारायण राणे हे सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांला राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत. यामुळे भाजपच्या गोटात पडद्यामागे राजकीय हालचाली सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा...ही घडी टीका- टिप्पणीची नव्हे, राष्ट्रवादीकडून पियूष गोयल यांच्या कामाचे कौतुक
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेत्यांच्या राजभवनातील बैठका वाढल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण, त्यात मिलिंद नार्वेकर यांची हजेरी. एवढंच काय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची घेतलेली भेट, नंतर 'सामना'तून राज्यपालांवर केलेली आगपाखड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: राज्यपालांची भेट घेतली आहे. आता भाजप नेते नारायण राणे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपनं अप्रत्यक्ष निर्माण केलं राजभवन सत्ता केंद्र...
राज्सात सत्ताकेंद्र हा नेहमी 'वर्षा' बंगला असतो, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून बहुतांस कामकाज 'मातोश्री' येथून चालले, आता राजभवन ही एक सत्ता केंद्र झाले. वरिष्ठ राज्यकीय नेते मंडळी गाठीभेटी तर होतातच त्याचवेळी सचिव दर्जा अधिकारी बैठका होत आहेत.
भाजप नेते, सीएम अथवा कॅबिनेट मंत्री भेट निवेदन न देता राज्यपाल यांना देतात यातूनच भाजपने अप्रत्यक्ष राजभवन सत्ता केंद्र पर्याय उपलब्ध केला आहे. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यास समांतर सत्ता केंद्र भाजपनं निर्माण केलं आहे. त्यातच ठाकरे शपथविधी सोहळ्यात शपथ घेताना मंत्री लिखीत शपथ पलिकडे जात वक्तव्य करतात. त्यावरून राज्यपाल यांनी शपथ घेणारे मंत्री खडसावणे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागा, रिक्त विधान परिषद निवडणूक, विद्यापीठ परीक्षा सारखे मुद्दे तसेच कोरोना आढावा बैठक, यासाठी सर्व प्रमुख सचिव बैठक यातून राज्यपाल यांनी ही योग्यवेळी राजपाल हे महत्त्वाचे स्थान असून फक्त रबर स्टॅम्प नाही हे दाखवून दिलं आहे.
हेही वाचा... खिसे तपासण्यावरून भाविकाची हत्या, रक्तानं माखलेल्या कपड्यात शिवसेना नेता अटकेत
राजभवन राज्यपाल आणि सीएम सरकार यांचा सत्ता संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारण अनेक वर्षात प्रथमच दिसू लागला आहे.
राज्यपाल हे शपथ देणे, विद्यापीठ कुलपती नामधारी, राज्यपाल फक्त रबर स्टॅम्प ही सामान्य लोकांच्या मनातील प्रतिमा आता पुसट करतानाच केंद्र सरकार वरदहस्त भूमिकेने राज्यपाल नव सत्ता केंद्र करू शकतात, हेच दिसू लागलं आहे.