मराठी बातम्या /बातम्या /पुणे /भाजपसोबत युती करणार? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टच उत्तर, म्हणाले....

भाजपसोबत युती करणार? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टच उत्तर, म्हणाले....

Raj Thackeray on alliance with BJP: भारतीय जनता पक्षासोबत मनसेची युती होणार का? यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Raj Thackeray on alliance with BJP: भारतीय जनता पक्षासोबत मनसेची युती होणार का? यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Raj Thackeray on alliance with BJP: भारतीय जनता पक्षासोबत मनसेची युती होणार का? यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे, 29 जुलै : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janata Party) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात युती (BJP - MNS alliance) होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती. यामुळे मनसे-भाजप युती होणार असल्याच्या चर्चांना अधिक बळकटी मिळाली. या संपूर्ण प्रकरणावर आज पुण्यात राज ठाकरेंना (Raj Thackeray) विचारले असता त्यांनी अगदीच स्पष्टीकरण दिलं आहे.

राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर राज ठाकरेंनी म्हटलं, "भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे. तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत".

आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्यांना आरोप भोवणार?

"भूमिकांना विरोध आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही आणि अमित शहांनाही नाहीये, वैयक्तिक देणघेणं नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत अभिनंदनही केलं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तुम्ही प्रश्न निर्माण करायचे आणि आम्हाला उत्तरं द्यायला सांगायचे. युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे, माझी भूमिका बदलत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Pune, Raj Thackeray