मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्यांना आरोप भोवणार?

आमदार प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्यांना आरोप भोवणार?

मी पक्षात नाराज नाही

मी पक्षात नाराज नाही

Pratap Sarnaik file defamation case against Kirit Somiaya: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे.

मुंबई, 29 जुलै : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार शिवसेनेच्या नेत्यांवर (Shiv Sena leaders) आरोप करत असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने (ED) छापेमारी सुद्धा केली होती. मात्र, आता प्रताप सरनाईक आक्रमक झाले असून त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ठाण्यातील (Thane) विशेष दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप निराधार, बेछूट, बेजबाबदार आहेत असं सरनाईकांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात, ठाणे कोर्टात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. रितसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे.

मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भाजपचे किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून तब्बल 16 ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केल्याचा आरोप आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली असल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती.

सामान्य रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार दिलासा, दोन डोस घेतलेल्यांना मिळू शकते मुभा

मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून अहवाल मागवला होता आणि पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यावेळी सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस आमदार सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती. तसेच बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत सांगितले होते. सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोलल्याप्रमाणे आमदार सरनाईक यांनी 100 कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी कोर्टात जवळपास 3 लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.

First published:

Tags: Kirit Somaiya, Mla pratap sarnaik