पुणे, 16 जुलै: पुण्यातील (Pune) गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका महिलेनं लाकडी दाड्यानं मारहाण करत आपल्या पतीची हत्या (Husband murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव (Plotted as suicide) आरोपी पत्नीनं रचला होता. पण आरोपी महिलेच्या मुलीमुळे हत्येचं गूढ समोर आलं आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून महिलेला ताब्यात (Accused wife arrest) घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दीपक बलवीर सोनार असं हत्या झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर राधिका दीपक सोनार असं अटक केलेल्या आरोपी पत्नीचं नाव आहे. मृत दीपक सोनार हे पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका जुन्या वाड्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर आरोपी राधिका या एका कपड्याच्या दुकानात काम करतात. मृत दीपकला दारुचं व्यसन आहे. सायंकाळी दारु पिऊन घरी आल्यानंतर, अनेकदा दीपक अनेकदा विविध कारणांवरून पत्नी राधिकासोबत वाद उकरून काढतो. यामुळे दोघांत अनेकदा कडाक्याची भांडणं देखील झाली आहेत. हेही वाचा- साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला दरम्यान सोमवारी मृत दीपक नेहमीप्रमाणे रात्री दारू पिऊन घरी आला. सोमवारीही किरकोळ कारणांतून त्यांच्यात वाद झाला. यामुळे संतापलेल्या राधिकानं मद्यधुंद असणाऱ्या दीपकला लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्याचा गळा दाबला. यामुळे दीपकचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी पत्नी राधिकानं पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला आणि दीपकचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यानंतर आरोपी राधिक दोन दिवसांसाठी घराबाहेर निघून गेल्या. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांनी दीपकनं आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. हेही वाचा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या; खूनाचं धक्कादायक कारण समोर पण दीपक यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना, त्यांच्या मुलीनं आपल्या वडिलांची आईनं हत्या केल्याची माहिती काही नातेवाईकांना दिली. हत्येचं गूढ उलगडताचं नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत, आरोपी पत्नी राधिका सोनार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.