2 मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार; विरहात पतीनं घेतला आत्महत्येचा निर्णय, वाचा पुढे काय झालं

2 मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार; विरहात पतीनं घेतला आत्महत्येचा निर्णय, वाचा पुढे काय झालं

Suicide News: पोटच्या दोन लेकरांना आणि पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीच्या विरहात एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न (husband tried to commit suicide) केला आहे.

  • Share this:

वाळूज, 08 मे: काही महिन्यांपूर्वी आपल्या पोटच्या दोन लेकरांना आणि पतीला सोडून गेलेल्या पत्नीचा विरह सहन न झाल्यानं एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न (husband tried to commit suicide) केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नैराश्यात गेलेल्या पतीचं समुपदेशन केलं आहे. तसेच त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं आहे. तसेच दोघा पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहावं असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. वेळेवर पोलीस पोहोचल्यामुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे

.रांजणगाव येथील रहिवासी असलेली 26 वर्षीय विवाहित महिला काही दिवसांपूर्वी आपल्या घराशेजारी राहाणाऱ्या अविवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने आपल्या साडे चार वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या दोन मुलांना आपल्या पतीकडेचं सोडलं होतं. अशा प्रकारे पत्नी सोडून गेल्यानं संबंधित युवक नैराश्यात गेला. दरम्यान पत्नीचा विरह सहन न झाल्यानं काल संबंधित युवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-4 मुलांच्या आईचं जडलं 22वर्षीय तरुणावर प्रेम; लग्नगाठ बांधण्याआधीच सगळं उद्धवस्त

आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलीस निरीक्षण आपल्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पीडित पतीची समजूत घालून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केला आहे. तर दुसरीकडे, एप्रिलमध्ये प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेलाही तिच्या प्रियकराने सोडून दिलं आहे. त्यामुळे तीही रांजणगावात एक स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. विशेष म्हणजे प्रियकरानं सोडून दिल्यानंतर तिनंही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पोलिसांनी तिची समजूत घालून आत्महत्या करण्यापासून रोखलं होतं.

हे वाचा-धक्कादायक! पत्नीनं बॉयफ्रेंडला घरी बोलावल्यानं संतापलेल्या पतीनं केली तिची हत्या

प्रियकराने धोका दिल्यानंतर, संबंधित विवाहित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून रांजणगावातचं स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. पती पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांची होणार होरपाळ पाहून दोघांनीही पुन्हा एकत्र यावं, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 8, 2021, 1:19 PM IST

ताज्या बातम्या