Home /News /crime /

अनैतिक संबंध बेतले जीवावर! पत्नीनं बॉयफ्रेंडला घरी बोलावल्यानं संतापलेल्या पतीनं केली तिची हत्या

अनैतिक संबंध बेतले जीवावर! पत्नीनं बॉयफ्रेंडला घरी बोलावल्यानं संतापलेल्या पतीनं केली तिची हत्या

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना बिहारमधील (Bihar Crime) लखीसराय येथून समोर आली आहे.

    विरूपूर, 07 मे : अनैतिक संबंधांमुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना बिहारमधील (Bihar Crime) लखीसराय येथून समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित पती घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 2 मे रोजी विरुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्कैजनी गावात एका प्रेमी युगुलाला आधी गावकऱ्यांनी रात्री झाडावर बांधले आणि मग सकाळी त्यांचे लग्न लावल्याची घटना घडली होती. संबंधित महिला आणि तिची बॉयफ्रेंड हे तुरकजनी गावचे रहिवासी आहेत. या प्रकाराबाबत तिच्या नवऱ्याला काहीच माहीत नव्हते कारण तो काही कामानिमित्त गावाबाहेर गेला होता. पत्नीनं छुप्या पद्धतीनं आपल्या प्रियकराला घरात बोलावलं. मात्र, ग्रामस्थांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी या दोघांना रात्रभर झाडावर बांधले आणि सकाळी खाली उतरवून त्यांचे लग्न लावून दिले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली मात्र दोघेही सज्ञान असल्याने विशेष कारवाई न करता दोघांनाही घरी परत सोडून दिले. हे वाचा - बॉलिवूडला आणखी एक धक्का; राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार वनराज भाटिया यांचं निधन मात्र, या संपूर्ण प्रकरणाची माहिती महिलेच्या नवऱ्याला समजताच त्याने पत्नीची हत्या केली. मृत पत्नीच्या भावाने आरोप केला आहे की, बहिणीचा हुंड्यापायी छळ सुरू होता आणि त्यातून तिचा मृत्यू झाला आहे. सासरचे लोक हुंड्याची मागणी करत असत. हुंडा न दिल्याने त्याने आपल्या बहिणीचे जबरदस्तीने दुसर्‍याशी लग्न केले. विरुपूर पोलीस ठाण्यात तडजोड केल्यानंतर ज्या ठिकाणी खून झाला तेथे सासरच्यांना पाठविण्यात आले. हे वाचा - PM Kisan Maandhan Yojana: शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील 36000 रुपये; महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये पोलीस अधीक्षक सुशील कुमार म्हणाले की, महिलेच्या पतीवर खुनाचा आरोप असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित आरोपींना लवकरात-लवकर अटक करण्यात येईल, त्यासाठी आमच्याकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. मारेकरी शक्य तितक्या लवकर पकडला जाईल. पोलीस या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्यात व्यग्र आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Police action

    पुढील बातम्या