बारामती, 16 फेब्रुवारी : राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. तर, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट बघावी लागते एकाच पक्षाच्या फाईल क्लिअर होतात आणि फायली क्लिअर करण्याला गती आली आहे. ज्यावेळेस अस्थिरता असते त्यावेळेस अशी गती येते. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राजकीय भूकंप होईल का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केला. रोहित पवार यांनी राज्याच्या सत्तासंघर्षावर सूचक असे ट्वीट केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आज रोहित पवार यांनी ट्वीटबद्दल खुलासा केला.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं…. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 15, 2023
असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे..
सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या…
‘माझ्या माझ्या ट्विटचा अर्थ मीडियाने आणि सामान्य माणसांनी भूकंप असा घेतला आहे. जे प्राणी जंगलामध्ये राहतात भूकंप येणार आहे त्यांना हे आधीच कळतं. त्या अनुषंगाने मी बोललो होतो, सध्याचे सत्ताधारी आमदार आहेत. ते आधी वेगळे बोलायचे परंतु आता वेगळं बोलत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट बघावी लागते. एकाच पक्षाच्या फाईल क्लिअर होतात आणि फायली क्लिअर करण्याला गती आली आहे. ज्यावेळेस अस्थिरता असते त्यावेळेस अशी गती येते. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर राजकीय भूकंपा होईल का? असा प्रश्न मी उपस्थित केला आहे’ असं रोहित पवार म्हणाले. (‘ज्योतिर्लिंग आसामला गुवाहाटीच्या बदल्यात दिलं का’? राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं) ‘सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे जे संविधानाच्या कक्षेत असेल तो निर्णय होईल म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल अशी आमची आशा आहे. चुकीचा पायंडा पडणार नाही अशी आमची आशा आहे, असंही रोहित पवार म्हणाले. ‘लोकांची सहानुभूती जगताप कुटुंबीयांना नक्कीच आहे. परंतु ते भाजपाला मतदान करतील असं नाही. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी दिली आहे. परंतु त्यांची क्षमता आहे का याचा अंदाज त्याचा अंदाज सर्वसामान्य लोकांना लागला आहे. सहानुभूती जरी जगताप यांच्या बाजूने असली तरी स्थानिक जनता ही भाजपचा विरोध करते येणाऱ्या काळात तो फरक आपल्याला दिसेल. कसबामध्ये जे समीकरण भाजपने पुढे आणला आहे, ते तिथल्या लोकांना पटले नाही. त्यामुळे तिथे देखील भाजपच्या विरोधात निकाल लागेल, असा दावाही रोहित पवारांनी केला. (हेही वाचा : गिरीश बापट पक्षावर नाराज आहेत का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं ) ‘पवार साहेबांमुळे क्रिकेटमध्ये काम करण्याची संधी मिळाली तसंच विद्यापीठांमध्ये देखील सिनेट सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याची संधी मिळत आहे, असंही रोहित पवार म्हणाले.