मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राज्यातील मंदिरे कधी खुली होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर

राज्यातील मंदिरे कधी खुली होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पुणे, 3 सप्टेंबर : राज्यातील बंद असलेली मंदिरे सुरू (Temples Reopen) करण्याची मागणी जोर धरत आहे. मंदिरे उघडण्यात यावी यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुद्धा सुरू केलं आहे. भाजप, मनसेकडून विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मंदिरे पुन्हा खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार (Maharashtra Government) कधी घेणार? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी मंदिरे खुली करण्यासाठी भाजप-मनसेच्या आंदोलनाबाबत विचारले. यावर अजित पवार म्हणाले, मंदिरे उघडा भाजप म्हणत आहे मात्र त्यांनी केंद्र सरकार काय म्हणतयं हे बघावं. सणासुदीच्या काळात गर्दी करू नका असं केंद्र सरकार म्हणत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जाला की महाविकास आघाडी सरकार मंदिरे खुली करेल.

अजित पवार संतापले अन् म्हणाले...

मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपला टोला

कुणी आक्रमक व्हाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्ताने काही साध्य होऊ शकतं का हे आजमवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत.

शिवसेना विरुद्ध भाजप वाद सुरू असताना नितेश राणेंनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र आणि...

अच्छे दिन म्हणत दोन वेळा मतदारांनी निवडून दिलं

अच्छे दिन म्हणत दोन वेळा मतदारांनी केंद्र सरकारला निवडून दिलं. मात्र, गॅसचे दर हजाराचा टप्पा गाठत आहे. पेट्रोल शंभरी पार झालं आहे आणि डिझेल शंभरीच्या जवळ आहे. केंद्र सरकार लक्ष देत नाही. शेतकरी आंदोलन 10 व्या महिन्यात प्रवेश करतंय, मात्र आंदोलन मोडून काढण्यावर भर देत आहे. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे केंद्राचे दुर्लक्ष हे जनतेचे दुर्दैव आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Pune, Temple