मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अजित पवार संतापले अन् म्हणाले 'या' बातम्या धादांत खोट्या

अजित पवार संतापले अन् म्हणाले 'या' बातम्या धादांत खोट्या

प्रसारमाध्यमांत येणाऱ्या बातम्यांवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे, 3 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांत येणाऱ्या काही बातम्यांवरुन संताप व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. मीडियाने विश्वासार्हाने बातम्या द्याव्यात... लोकांचा, आमचा विश्वास उडत चालला असल्याचंही यावेळी अजित पवार म्हणाले. पाहूयात नेमकं अजित पवार काय म्हणाले...

या बातम्या कुठून येतात कळत नाही

अजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी भवनात बसलो होतो तर कुणी म्हणतं हेमंत टकलेंचं नाव दिलं. तुम्हीच लोक चालवता की अमक्याचं नाव शिवसेनेने कमी केलं. तमक्याचं नाव कमी केलं. राजू शेट्टी यांचा पत्ता कट हेमंत टकले यांना संधी, याही बातम्या कुठून येतात कळत नाही.

शहानिशा करुन बातम्या द्याव्यात

काही लोकांमुळे सहकार बदनाम झालंय, माझ्या सारख्या 40 वर्ष राजकारणात आहे. मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो... अशा खोट्या बातम्या वाचून, पाहून खंत वाटते. राज्य बँक, संचालक यांची काही चौकशी, छापेमारी झाली नाहीये. मीडियाने शहानिशा करून बातम्या चालवाव्या असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचा हवाला देत शिवसेनेकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

या बातम्या धादांत खोट्या

बारामतीला मी घेतलेल्या जमिनीची सीबीआय चौकशी झाल्याची बातमी लावली. ईडीने राज्य सहकारी बँकेवर छापेमारी केल्याच्या बातम्या मीडियाने लावल्या... या बातम्या धादांत खोट्या असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपला टोला

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, कुणी आक्रमक व्हाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्ताने काही साध्य होऊ शकतं का हे आजमवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Pune