• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • मित्रांसोबत बहिणीकडं गेला अन्...; पिंपरीत भरदिवसा सराईतावर कोयत्यानं सपासप वार

मित्रांसोबत बहिणीकडं गेला अन्...; पिंपरीत भरदिवसा सराईतावर कोयत्यानं सपासप वार

Crime in Pimpari: कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा एका सराईत गुन्हेगार तरुणावर कोयत्यानं सपासप वार (Attack on criminal) केले आहेत.

 • Share this:
  पिंपरी, 28 जून: कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा एका सराईत गुन्हेगार तरुणावर कोयत्यानं सपासप वार (Attack on criminal) केले आहेत. हा हल्ला इतका भयानक होता, की या हल्ल्यात संबंधित तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू (Death) झाला आहे. मृत तरुण हा आपल्या काही मित्रांसोबत आपल्या बहिणीला भेटायला गेला होता. त्याचवेळी त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य मित्रांनी हल्लेखोरांचा रोष पाहून घटनास्थळावरून आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी काही संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. निशांत सुरवसे असं हत्या झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो सज्जनगड (राहटणी) येथील रहिवासी आहे. मृत निशांत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत बहिणीला भेटायला राहटणी येथे गेला होता. दरम्यान कारमधून आलेल्या काही हल्लेखोरांनी निशांतवर कोयत्यानं हल्ला चढवला. हल्लेखोरांचा उग्र अवतार पाहून निशांतच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींनी निशांतच्या डोक्यावर आणि अन्य शरीरावर कोयत्यानं सपासप अनेक वार केले होते. हा हल्ला इतका भयानक होता की, निशांत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीनं वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेच्या चौकशीला सुरुवात केली. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशीरा काही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे. हेही वाचा- कोरोनामुळे व्यवसायाची लागली वाट; दाम्पत्यानं आखला दरोड्याचा प्लॅन अन् घडलं भलतंच, घटना CCTV मध्ये कैद पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत निशांत हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्या नावावर वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. दोन गटाच्या वर्चस्व वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: