मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनामुळे व्यवसायाची लागली वाट; दाम्पत्यानं आखला दरोड्याचा प्लॅन अन् घडलं भलतंच, घटना CCTV मध्ये कैद

कोरोनामुळे व्यवसायाची लागली वाट; दाम्पत्यानं आखला दरोड्याचा प्लॅन अन् घडलं भलतंच, घटना CCTV मध्ये कैद

Robbery Live Video: कोरोना काळात व्यवसायात मोठं आर्थिक नुकसान झाल्यानं एका दाम्पत्यानं सराफाच्या दुकानात दरोडा प्लॅन रचला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदाबाद, 28 जून: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आलं आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. परिणामी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परिणामी बेरोजगारी वाढल्यानं कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा यातून अनेकजण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत. कोरोना काळात व्यवसायात मोठं आर्थिक नुकसान झाल्यानं एका दाम्पत्यानं सराफाच्या दुकानात दरोडा प्लॅन रचला होता. पण सर्वकाही त्यांच्या प्लॅननुसार न घडल्यानं दाम्पत्याला तुरुंगवारी घडली आहे.

आरोपी तरुणानं मुलांचा सांभाळ करता यावा आणि पत्नीच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी हा दरोड्याचा प्लॅन (couple plotted robbery) आखला होता. पण त्याचा हा प्लॅन पूर्णपणे फसला आहे. त्यानं आपल्या पत्नीला सोबत घेऊन बंदुकीच्या धाकानं सोन्याचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील दागिने बॅगेत भरायला सुरुवात केली. दरम्यान दुकानातील व्यक्तींनी अचानक हल्ला केल्यानं आरोपी दाम्पत्याला पकडण्यात आलं आहे. या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

संबंधित घटना गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. आरोपींनी दिवसाढवळ्या दुकानात शिरून चोरीचा प्रयत्न केला आहे. आरोपी पत्नी दुकानातील दागिनं बॅगेत भरत असताना, आरोपी तरुणानं दुकानातील एका व्यक्तीचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीचं लक्ष विचलित झालेलं पाहून दुकानातील अन्य व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा-मुंबईत ऑनलाइन क्लासमध्ये लावला पॉर्न व्हिडीओ; हॅकर्सनं VIDEO सुरू केला आणि...

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आरोपी दाम्पत्याला काय करावं ते सुचलं नाही. त्यामुळे हे आरोपी दाम्पत्याचा चोरीचा प्लॅन पूर्णपणे फसला आहे. संबंधित ज्वेलर्सनं आरोपी दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gold robbery, Gujrat, Video